मेट्रोसाठी एकच कार्ड आणण्याच्या हालचाली

नवी दिल्ली – देशातील सर्वच मेट्रोंमध्ये प्रवास करता येण्यासारखे वन मेट्रो वन कार्ड केंद्र सरकार सुरू करण्याच्या तयारीत आहे. मेट्रोच्या ठराविकच फेऱ्यांसाठी या कार्डाचा उपयोग करता येणार आहे. तसेच अन्य राज्यांमध्ये या कार्डचा वापर करायचा असल्यास कार्ड काऊंटरवर नेऊन ते रिचार्ज करावे लागणार आहे.

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने प्रवासाठी वन नेशन वन कार्ड योजना सुरू केली होती. या कार्डच्या माध्यमातून कोणत्याही राज्यांमध्ये परिवहन सुविधेचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान, या सेवेचा लाभ घेण्यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असेल. तसेच यासाठी बॅंकांची मदत घेता येणार आहे. हे मेट्रो कार्ड क्रेडिट आणि डेबिट कार्ड प्रमाणेच असेल.
पुढील सहा महिन्यांमध्ये हे कार्ड सुरू होण्याची शक्‍यता आहे.

दरम्यान, भारतात फिरण्यासाठी किंवा कमी कालावधीसाठी वास्तव्यास येणाऱ्या लोकांना या कार्डाचा लाभ घेता येणार नसल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तसेच केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय हे कार्डही देण्यात येणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.