दुचाकीला अपघात एक ठार, एक जखमी

पिंपरी – भोसरी पुलावर रोडवरील दुभाजकावर बुलेट मोटारसायकल आदळल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. ही घटना 3 जून रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास घडली.

दिग्विजय किरण मेंदनकर (वय- 23 रा. मेंदरकरवाडी, चाकण) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर या अपघातात तेजस गोपाळ गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलीस हेड कॉंस्टेबल सुरेश मुंढे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिग्विजय मेंदनकर आपला मित्र तेजस गोपाळ याच्यासोबत घेऊन त्याची बुलेट (एमएच 14/ईटी/ 8070) वरुन भोसरीकडे जात होते. त्यांची गाडी भोसरी पुलावर आल्यानंतर अचानक रस्त्यावरील दुभाजकाला धडकून अपघात झाला. या अपघातात दिग्विजयचा मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेल्या गोपाळ यांना गंभीर दुखापत झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.