जाणून घ्या सामना सुरूच झाला नाही तर डकवर्थ लुईस नियमानुसार कोण ठरेल विजेता?

मँचेस्टर – भारत विरुद्ध पाकिस्तान या हायहोल्टेज सामना पावसामुळे पुन्हा एकदा खंडित झाला आहे. पावसामुळे सामना थांबवावा लागला त्यावेळी पाकिस्तानची स्थिती ३५ षटकांमध्ये ६ गड्यांच्या मोबदल्यात १६६ धावा अशी होती. तत्पूर्वी भारताच्या डावावेळी देखील सामना पावसामुळे थांबवावा लागला होता.

दरम्यान, सध्या भारताला सामना जिंकण्यासाठी ४ विकेटची गरज आहे तर दुसरीकडे पाकिस्तानला विजयासाठी ९० चेंडूंमध्ये १७१ धावांची आवश्यकता आहे. सध्या पावसामुळे सामना थांबवावा लागला असला तरी भारत मजबूत स्थितीत असून पावसामुळे खेळ पुन्हा सुरु झालाच नाही तरी डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानचा संघ ८६ धावांनी मागे असल्याने भारताचा विजय जवळपास निश्चित आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×