मुंबई – मौनी रॉय हि टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी आहे. तिने आपल्या प्रतिभेच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे, आपल्या मेहनतीच्या जोरावर मौनी टीव्ही मालिकांपासून चित्रपटांपर्यंतचा प्रवास केला आहे. मौनीला तिच्या अभिनयामुळे आणि फॅशन सेन्सचीही नेहमीच चर्चेत असते.
मौनीचा प्रत्येक लूक खूपच वेगळा आणि प्रेक्षणीय आहे. ती डेट नाईटवर गेली असो किंवा विमानतळावर दिसली असो, ती सर्वत्र तिच्या लूकने चाहत्यांची मने जिंकण्यात यशस्वी होते. अलीकडेच ती पुन्हा एकदा विमानतळावर दिसली. यावेळी तिचा कूल लुक पुन्हा एकदा चर्चेत आला याशिवाय तिच्या बॅगची चर्चा आता सोशल मीडियावर होत आहे. मौनीच्या बॅगने सर्वांचे लक्ष वेधले आहे. विमानतळावर लाखोंची बॅग घेऊन आली होती. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या व्हिडिओमध्ये दिसलेली मौनीची बॅग ख्रिश्चन डायर ब्रँड असून हि बॅग तब्बल ३ लाखांची आहे. त्याचबरोबर तिच्या या व्हिडिओवर जबरदस्त प्रतिक्रिया येत आहेत. अनेक सोशल मीडिया युजर्सने मौनीच्या बॅगला खूप पसंती दिली असून अनेकांनी कमेंट करताना ही बॅग लोकल मार्केटमध्ये अतिशय स्वस्त दरात उपलब्ध होईल, असे सांगितले आहे. एका यूजरने लिहिले, ‘हे आमच्या मार्केटमध्ये 400 रुपयांना मिळेल’.
मौनी रॉयची गणना बॉलिवूडच्या स्टायलिश अभिनेत्रींमध्ये केली जाते. आउटफिट्सपासून ते बॅगपर्यंत, प्रत्येक स्टाईलमध्ये नवीन ट्रेंड सेट करण्यासाठी ती ओळखली जाते.