Vijay Deverakonda New Film| दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाचा मोठा चाहता वर्ग आहे. साउथ इंडस्ट्रीसह बॉलीवूडमध्ये देखील त्याने काम केले आहे. आज 9 मे रोजी विजय त्याचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित अनेक सेलिब्रिटी आणि चाहते त्याला शुभेच्छा देत आहेत. यातच आता विजयच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक सरप्राइज देण्यात आले आहे. निर्माते दिल राजू यांनी विजयच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे.
विजयच्या वाढदिवसाच्या खास दिवशी चित्रपटाचा फर्स्ट लूक कॉन्सेप्ट पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. सध्या या चित्रपटाचे नाव निश्चित झालेले नाही. नाव अंतिम होईपर्यंत ते ‘SVC 59’ म्हणून ओळखले जाईल. देवराकोंडाच्या नवीन प्रकल्पाच्या निर्मात्यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक आर्टवर्क पोस्टर शेअर केले आहे.
ज्यात कॅप्शनमध्ये, “रक्तात, तो उठेल, राज्य करेल आणि सर्वत्र सामूहिक लाटा पेटवेल! SVC 59, देवराकोंडाचा अवतार.” या पोस्टरमध्ये, एका रक्ताने माखलेल्या हातात खंजीर धरले असल्याचे पाहायला दिसत आहे. सध्या हे पोस्टर प्रेक्षकांच्या देखील पसंतीस पडत आहे.
View this post on Instagram
या चित्रपटात विजय देवरकोंडा व्यतिरिक्त इतर कोणते कलाकार काम करणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. हा चित्रपट तेलुगू सोबतच हिंदी, मल्याळम, कन्नड आणि तामिळ भाषेतही प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, विजय देवरकोंडा शेवटचा ‘फॅमिली स्टार’मध्ये दिसला होता. या चित्रपटात विजयसोबत मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत होती. मात्र, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची कामगिरी फार खराब झाली. यानंतर विजय लवकरच ‘जर्सी’ प्रसिद्ध दिग्दर्शक गौतम नायडू तिन्नानुरी यांच्या VD12 या चित्रपटातही काम करणार आहे.
हेही वाचा:
‘सिकंदर’ चित्रपटात सलमान खान – रश्मिकाची दिसणार ‘केमेस्ट्री’