मुंबई – छोट्या पडद्यावरील अभिनेत्री नेहा मर्दाने काही महिन्यांपूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिला. तब्बल 10 वर्षांनंतर नेहा आणि तिचा पती आयुष्मान अग्रवाल हे आई-वडील झाले आहेत. यामुळे ते खूप आनंदी आहेत. नुकतेच त्यांच्या मुलीचा नामकरण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. याचे काही फोटो आणि व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
https://www.instagram.com/reel/Ctd4ZHfhRZc/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
नेहा मर्दाने तिच्या इंस्टाग्रामवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यातून तिने तिच्या मुलीचे नाव ‘अनया’ ठेवले आहे. नेहाने 9 जून 2023 रोजी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होता. ज्यातून तिने तिच्या मुलीचे नाव ‘अनया’ असल्याचे सांगितले होते. व्हिडिओमध्ये नेहा पती आयुष्मान अग्रवालसोबत दिसत आहे. नेहाच्या मुलीच्या नामकरणाचे ठिकाणही भव्य आणि अप्रतिम सजावट केल्याचे पाहायला मिळते. यावेळी नेहा आणि आयुष्मानने कुटुंबासह त्यांच्या मुलीसाठी केक कापला.
https://www.instagram.com/p/CtQ9m93hTmU/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
या सोहळ्यादरम्यान, नेहाने तिच्या बाळाला फिकट गुलाबी रंगाचा फ्रॉक परिधान केला होता, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तर नेहा देखील राजस्थानी लूकमध्ये दिसली. पारंपारिक लुकमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलले होते. दरम्यान, नेहाने ‘देवों के देव महादेव’, ‘पिया अलबेला’, ‘लाल इश्क’ अशा छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण ‘बालिका वधू’ या मालिकेमुळे नेहाला जास्त लोकप्रियता मिळाली.