पुणे – हास्ययोगाचा उपयोग मला अनेक चित्रपटांत झाला आहे. लोकांना आनंदी ठेवण्यासाठी विनोदी काम करण्यावर भर दिला. संपत्ती आणि संस्कार दोन्ही महत्वाचे असले, तरी त्यात संस्कार मूल्ये अधिक महत्वाचे आहेत. संपत्ती “विल’ तयार करते, तर संस्कारमूल्ये “गुडविल’ तयार करतात, असे मत अभिनेते सुनील गोडबोले यांनी व्यक्त केले.
“जागतिक हास्य दिना’निमित्त नवचैतन्य हास्ययोग परिवारातर्फे बालगंधर्व रंगमंदिरात हास्य प्रात्यक्षिके आणि व्याख्यानाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि शेवटी हास्ययोगाच्या विविध प्रकारातून विठ्ठल आण्इ सुमन काटे आणि मकरंद टिल्लू यांनी प्रात्यक्षिके घेतली.
यावेळी अभिनेते सुनील गोडबोले, बांधकाम व्यावसायिक दिलीप कोटीभास्कर, गिनीज बुक रेकॉर्ड होल्डर आशिष कासोदेकर, उद्योजक प्रसन्न पाटील, पोपटलाल शिंगवी, विजय भोसले आदी उपस्थित होते.कृषी, पर्यटन क्षेत्रात अनेकदा गमतीचे प्रसंग येतात. त्यातून हास्याचे धुमारे उडतात. कृषी पर्यटनादरम्यान परदेशी लोकांशी संवाद करताना सांकेतिक आणि हास्याची भाषा उपयोगी पडते. हास्य क्लबच्या माध्यमातून या केंद्रांवर कार्यक्रम करावेत. शरीर आणि मनाचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी हास्य योग अतिशय उपयुक्त आहे. शेतकऱ्यांच्या, तसेच एकाकी जीवन जगणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी नवचैतन्य हास्ययोग परिवाराने पुढाकार घ्यावा, असे तावरे यांनी भाषणातून सुचवले.
जीवनाकडे सकारात्मक बघण्याचा दृष्टिकोन असे क्लब देतात. हास्य क्लब सर्वत्र पोहोचले, तर भवताल आनंदमय होईल, असे सांगून चांगल्या आरोग्यासाठी “हसत हसत पळा, पळता पळता हसा’ आणि “बी टुगेदर, अचिव्ह टुगेदर, सेलिब्रेट टुगेदर’ असा कानमंत्रा कासोदेकर यांनी दिला.
“चांगल्या मानसिक आणि शारीरिक आयुष्यासाठी हास्य क्लब उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे नवीन गृहप्रकल्प देताना आमचाही हास्य क्लब अमेनिटी म्हणून देण्याचा विचार आहे. आनंदी विचार देणारे हास्य क्लब वाढण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असे कोटीभास्कर यांनी नमूद केले.