मुंबई – बॉलिवूडची दिवंगत अभिनेत्री नूतन आजही तिच्या जबरदस्त अभिनयासाठी आणि सौंदर्यासाठी ओळखली जाते. आज ती आपल्यात नसली तरी ती आपल्या कामाने नवीन कलाकारांना प्रेरणा देत असते. नूतनप्रमाणेच त्यांचा मुलगा मोहनीश बहल यानेही त्यांची प्रत्येक भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. आता मोहनीशची मुलगी प्रनूतनही इंडस्ट्रीत पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे.
प्रनूतनने ‘नोटबुक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तिचा अभिनय प्रेक्षकांना आवडला, पण प्रनूतन त्यानंतर चित्रपटांमध्ये दिसली नाही. मात्र, ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे इंस्टाग्रामवर मोठया प्रमाणात फॅन फॉलोअर आहेत. अशात आता अभिनेत्री तिच्या एका फोटोमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.
View this post on Instagram
प्रनूतन तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. यावेळी ती खूपच बोल्ड लूकमध्ये पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये अभिनेत्रीने ऑरेंज कलरचा ब्रॅलेट घातलेला दिसत आहे. यासोबत तिने ब्लू डेनिम जीन्स कॅरी केली आहे. हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने हेअर बॅरियर आणि न्यूड मेकअप केला आहे. यासोबत तिने गळ्यात मोत्यांची माळ घातली आहे.
आता प्रनूतनचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिची अशी बोल्ड स्टाइल पाहून चाहते वेडे झाले आहे. त्याचबरोबर काही लोकांनी तिला ट्रोल केले आहे. तिला कपडे घालण्याचा सल्लाही दिला आहे.
प्रनूतनच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर, ती नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘हेल्मेट’ या चित्रपटात दिसली आहे. या चित्रपटात तिसोबत अपारशक्ती खुराना मुख्य भूमिकेत दिसला. या चित्रपटातील दोन्ही कलाकारांचा अभिनय सर्वांनाच आवडला आहे.