Mohammed Shami| भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी पुन्हा एकदा मैदानात उतरण्याची शक्यता आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतून शमी पुनरागमन करण्याची शक्यता असल्याचे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले आहे.
परंतु शमीला जूनमध्ये होणाऱ्या T20 विश्वचषक 2024 मधून वगळण्यात आले आहे. शमी दुखापतीमुळे अनेक महिन्यांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत त्याने भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. गेल्या महिन्यात लंडनमध्ये त्याच्या टाचांवर शस्त्रक्रिया करण्यात होती. जी अद्याप पूर्णपणे बरी झालेली नाही. Mohammed Shami|
शमीच्या हेल्थबाबत माहिती देताना जय शहा म्हणाले, “शमीवर शस्त्रक्रिया झाली असून तो भारतात परतला आहे. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत शमीचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे.” याशिवाय रिषभ पंत यंदाचा आयपीएल मोसम खेळणार असल्याचे जय शहा यांनी स्पष्ट केले. यंदाच्या आयपीएल स्पर्धेची सुरूवात येत्या 22 मार्चपासून होणार आहे. त्यापूर्वी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने (एनसीए) यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतबातचे तंदुरुस्ती प्रमाणपत्र सादर केल्याने त्याला आयपीएल स्पर्धा खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, शमीने एकदिवसीय विश्वचषकात अप्रतिम गोलंदाजी केली होती. त्याने केवळ 7 सामन्यात 24 विकेट घेतल्या. तो या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला होता. तो भारताकडून पेन किलर घेऊन सामने खेळला. दुखापतीतून सावरण्यासाठी शमी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात लंडनला गेला त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर शमीने 26 फेब्रुवारी रोजी यशस्वी शस्त्रक्रियेची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली होती. Mohammed Shami|
हेही वाचा:
India vs England Test Series : रोहितच्या नेतृत्वाने प्रभावीत झालो – राहुल द्रविड