Sudhir Mungantiwar । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचा जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. शिंदे आणि अजित पवार गट काही जागांवर अडून बसल्यामुळे जागा वाटपाचा फॉर्म्युल्याला उशीर होतोय. त्यातच सध्या सुधीर मुनगंटीवार यांच्या लोकसभा निवडणुकीच्या चर्चा सर्वत्र सुरु झाल्या आहेत. याच चर्चांवर मुनगंटीवार यांनी आपले मत मांडलंय.
राज्यसभेतील खासदार आणि राज्यातील मंत्र्यांना, आगामी लोकसभा निवडणुकीत उतरवण्याची भाजपाची रणनिती आहे. याचाच भाग म्हणून सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेच तिकीट मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यांना चंद्रपूरमधून लोकसभेची उमेदवारी मिळू शकते. काल ते सुद्धा भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीसाठी दिल्लीला गेले होते. त्यावरून त्यांना सवाल करण्यात आला असता त्यांनी आपण लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे म्हटले.
लोकसभेत जाण्याची माझी इच्छा नाही Sudhir Mungantiwar ।
“मला तिकीट कोणत्याही परिस्थितीत मिळू नये, यासाठी मी पूर्ण प्रयत्न करतो आहे. मात्र शेवटी यश-अपयश हे ईश्वराच्या हाती आहे. लोकसभेत जाण्याची माझी इच्छा नाही. पण पक्षाचा आदेश सर्वतोपरी असतो” असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. “मला पक्षाने या राज्याची सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली. अयोध्येत श्रीरामाच्या मंदिरासाठी कास्ट पाठवण्याची संधी मला मिळाली” असे म्हणत त्यांनी समाधान व्यक्त केले.
पक्षाने आदेश दिला तर कार्यकर्ता म्हणून ते माझं कर्तव्य Sudhir Mungantiwar ।
पाकिस्तान सीमेवर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची संधी मला मिळाली. वाघ नख घेऊन येण्याचा एमओयु करण्याची संधी मला मिळाली. चंद्रपूर सारख्या जिल्ह्यामध्ये मला ज्याप्रमाणे विकास करण्याची संधी मिळाली. चंद्रपूरचा विकास करताना वेगवेगळी काम करता आली” असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. “माझी अजून तयारी झाली नाही. मी पक्षाकडे अजून हीच विनंती करतो आहे, मला इथेच राहू द्या असं मी म्हणतो आहे. पण पक्षाने आदेश दिला तर कार्यकर्ता म्हणून ते माझं कर्तव्य आहे” असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.