Nomination of Maharashtra BJP Leaders । राज्यात सत्ताधारी महायुतीच्या जागा वाटपावरून सध्या ओढाताण होताना दिसून येतीय. सत्तेत असणारे शिंदे गट आणि अजित पवार गट काही जागांवर असून बसल्याचा सध्या चर्चा सुरु आहे. त्यातच दोन्ही पक्षांना सन्मानजनक जागा देण्यात येणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात येतंय. त्यामुळं आता महायुतीच्या जागव वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीची सतत दिल्लीत बैठक होत आहे. अखेर नुकत्याच झालेल्या बैठकीत जागा वाटपावर तोडगा निघणार असल्याची चर्चा आहे.
भाजपची दिल्लीत आज केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार आशिष शेलार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीला गेले होते.
भाजपच्या राज्याच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. यानंतर पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.
अशात मिळलेल्या माहितीनुसार, या बैठकीत महाराष्ट्रातील 25 जागांवर चर्चा झाली. भाजपच्या विद्यमान 25 जागांवर आजच्या बैठकीत चर्चा झाली आहे. आता आज भाजपची उमेदवारांची दुसरी यादी येण्याची शक्यता आहे. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाच्या जागांवर चर्चा झाल्याचीही चर्चा आहे. मात्र, प्रामुख्याने 25 जागांवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
Nomination of Maharashtra BJP Leaders ।भाजपच्या या नेत्यांची उमेदवारी पक्की ?
भाजपच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत नागपुरातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तर बीडमधून पंकजा मुंडे, चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
तसेच जालन्यातून मंत्री रावसाहेब दानवे यांना पुन्हा एकदा संधी दिली जाण्याची शक्यता आहे. तर पुण्यातून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संजयकाका पाटील यांना सांगलीतून पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना भिवंडीतून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर केंद्रीय मंत्री भारती पवार यांना दिंडोरीतून उमेदवारी देण्याबाबत चर्चा झालीय. एकूण 25 जागांवर चर्चा झाली आहे.
हे वाचाल का ?
Ajit pawar । मंत्रिमंडळ बैठकीनंतर अजित पवारांनी नावाची पाटी बदलली, उपमुख्यमंत्र्यांच्या पाटी सर्वत्र चर्चा
भाजपची दुसरी यादी तयार ! 100 नावांचा झाला विचार, जाणून घ्या उमेदवार कधी येणार?