ICC Player of the Month : आयसीसीने प्लेअर ऑफ द मंथसाठी तीन खेळाडूंची नावे नॉमिनेट केली आहेत, त्यापैकी दोन ऑस्ट्रेलियाचे आणि एक भारताचे आहेत. आयसीसीच्या या नामांकन यादीत ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल आणि ट्रॅव्हिस हेड यांचा समावेश आहे, तर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचाही या यादीत समावेश आहे.
ट्रॅव्हिस हेड
ट्रॅव्हिस हेड विश्वचषकापूर्वी पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता, आणि दीर्घ दुखापतीतून पुनरागमन करत होता, परंतु तरीही विश्वचषक संघात त्याचा समावेश होता. जवळपास निम्म्या विश्वचषकानंतर ट्रॅव्हिस हेडने संघात पुनरागमन केले आणि त्यानंतर 6 सामन्यात 54.83 च्या सरासरीने आणि 127.51 च्या स्ट्राइक रेटने एकूण 329 धावा केल्या. या काळात त्याने दोन शतके आणि एक अर्धशतकी खेळी खेळली. विश्वचषकाच्या उपांत्य आणि अंतिम सामन्यांमध्ये त्यानं दोन विशेष कामगिरी केल्या, ज्यासाठी त्याला या दोन्ही सामन्यांमध्ये सामनावीराचा पुरस्कारही मिळाला.
ग्लेन मॅक्सवेल
या यादीतील दुसऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूचे नाव आहे ग्लेन मॅक्सवेल, ज्याने या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला विश्वचषक चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. मॅक्सवेलने 9 विश्वचषक सामन्यांमध्ये 66.66 च्या सरासरीने आणि 150.37 च्या स्ट्राईक रेटने 400 धावा केल्या आहेत. या काळात त्याने दोनदा शतकी खेळी खेळली. मॅक्सवेलने अफगाणिस्तानविरुद्ध 201 धावांची नाबाद खेळीही खेळली, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाने गमावलेला सामन्यात पुनरागमन करत विजय मिळवला होता. मॅक्सवेलची ती खेळी अशी होती की ती शतकात एकदाच पाहायला मिळते.
मोहम्मद शमी
आयसीसीच्या या यादीत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचेही नाव आहे. मोहम्मद शमीने विश्वचषकात उशिराने पदार्पण केले, परंतु तरीही सर्वाधिक विकेट घेत त्यानं अव्वलस्थान पटकावले . शमीने या विश्वचषकात एकूण 7 सामने खेळले आणि केवळ 10.70 च्या उत्कृष्ट सरासरीने आणि 5.26 च्या इकॉनॉमी रेटने एकूण 24 बळी घेतले. या कालावधीत शमीने तीन वेळा 5 विकेट्स आणि एकदा 4 विकेट्स घेतल्या.