Wednesday, May 14, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

IPL 2024 (RCB vs SRH Match 30) : 287 धावा केल्यानंतरही हैदराबादचा अवघ्या 25 धावांनी विजय, बेंगळुरूचा सहावा पराभव…

by प्रभात वृत्तसेवा
April 16, 2024 | 1:00 am
IPL 2024 (RCB vs SRH Match 30) : 287 धावा केल्यानंतरही हैदराबादचा अवघ्या 25 धावांनी विजय, बेंगळुरूचा सहावा पराभव…

Live Cricket Score, RCB vs SRH, Indian Premier League 2024 :  इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) चा 30 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडला.या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 25 धावांनी पराभव केला. या सामन्यात एकूण 549 धावा झाल्या. प्रथम सनरायझर्स हैदराबादने 287 धावा केल्या. त्यानंतर प्रत्युत्तरात बेंगळुरू संघाला 20 षटकात 7
बाद 262 धावांंच करता केल्या.

हैदराबादने दिलेल्या 288 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीनेही वेगवान सुरुवात केली. कर्णधार फाफ डुप्लेसिस आणि विराट कोहली तुफानी शैलीत खेळताना सहा षटकामध्येच धावसंख्या बिनबाद 79 धावांपर्यंत मजल मारून दिली होती. मात्र, प्रभावशाली खेळाडू म्हणून आलेल्या मयंक मार्कंडेने विराट कोहलीला बाद करून हैदराबादला पहिले यश मिळवून दिले. जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत असलेल्या कोहलीने पॉवरप्ले संपल्यानंतर (6.2 षटक) लगेचच त्याची विकेट गमावली. 20 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारासह 42 धावा करून कोहली बाद झाला. त्यानंतर 8.0 षटकात आरसीबीला 100 धावसंख्येवर दुसरा धक्का विल जॅकच्या रूपाने बसला जो धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. उनाडकटच्या चेंडूवर डुप्लेसिसने शॉट खेळला, पण चेंडू उनाडकटच्या बोटाला स्पर्श करून विकेटला लागला आणि जॅकला 7 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.

Impact man 𝐌𝐀𝐑𝐊𝐀𝐍𝐃𝐄 🔥#PlayWithFire #RCBvSRH pic.twitter.com/AvM235nASL

— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 15, 2024

चांगल्या सुरुवातीनंतर आरसीबीचा डाव फसला आणि त्यांनी रजत पाटीदारच्या रूपाने 9 व्या षटकात 111 धावसंख्येवर तिसरी विकेट गमावली. पाच चेंडूत नऊ धावा करून पाटीदार बाद झाला. मयंक मार्कंडेने पाटीदारला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मार्कंडेची या सामन्यातील ही दुसरी विकेट होती. त्यानंतर लगेगच पॅट कमिन्सने 9.3 षटकात कर्णधार फॅफ डुप्लेसिसला बाद करून आरसीबीला चौथा आणि मोठा धक्का दिला. जबरदस्त फॉर्मात दिसत असलेला डुप्लेसिस 28 चेंडूंत सात चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 62 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने सौरव चौहानला खाते न उघडताच बाद करून आरसीबीला पाचवा धक्का दिला. कमिन्सने त्याच षटकात डुप्लेसिसला बाद केले आणि शेवटच्या चेंडूवर सौरवलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तेव्हा आरसीबीला 60 चेंडूत विजयासाठी 166 धावांची गरज होती.

त्यानंतर दिनेश कार्तिक आणि महिपाल लोमरोर यांनी आरसीबीचा डाव सावरला. या दोन्ही फलंदाजांनी 13वे षटक टाकण्यासाठी आलेल्या मयंक मार्कंडेच्या षटकातून 25 धावा काढल्या आणि आरसीबीने 13 षटकांअखेर पाच गड्यांच्या मोबदल्यात 160 धावसंख्येपर्यत मजल मारली होती, पण हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने शानदार गोलंदाजी करत 14.1 षटकात 181 धावसंख्येवर महिपाल लोमरोरला बाद करत सहावा धक्का दिला. लोमरोर आणि दिनेश कार्तिक यांनी विकेटचे धक्के बसल्यानंतर आरसीबीचा डाव सावरला होता, मात्र कमिन्सने लोमरला बाद करून ही भागीदारी तोडली. लोमरोर 11 चेंडूत 19 धावा करून बाद झाला. कमिन्सची या सामन्यातील ही तिसरी विकेट होती.

बेंगळुरूची सातवी विकेट 18.5 षटकांत 244 धावांवर पडली. 35 चेंडूत 83 धावा करून दिनेश कार्तिक बाद झाला. त्याच्या बॅटमधून 5 चौकार आणि 7 षटकार आले. दिनेश कार्तिकने 83 धावांची तुफानी खेळी केली, मात्र तो आरसीबीला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. अखेर बेंगळुरू संघाला 20 षटकात 7 बाद 262 धावांपर्यतच मजल मारता आली आणि सामना गमवावा लागला. सनरायझर्स हैदराबादकडून कर्णधार पॅट कमिन्सने 43 धावांत सर्वाधिक तीन बळी घेतले.

तत्पूर्वी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 20 षटकात 3 विकेट गमावताना 287 धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासात कोणत्याही संघाने केलेली ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली.

Innings Break!

A batting carnage in Chinnaswamy as @SunRisers have set a record 🎯 of 288 🔥#RCB chase coming up shortly!

Scorecard ▶️ https://t.co/OOJP7G9bLr#TATAIPL | #RCBvSRH pic.twitter.com/okSG4l2A3b

— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2024

या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु हेड आणि अभिषेक शर्मा यांनी पहिल्याच षटकात शानदार फलंदाजी करत डुप्लेसिसचा निर्णय चुकीचा सिद्ध करण्यास जास्त वेळ लावला नाही. दोन्ही फलंदाजांनी तुफानी फलंदाजी करत अवघ्या 27 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. पॉवरप्ले संपेपर्यंत हैदराबादने एकही विकेट न गमावता 76 धावा केल्या होत्या.

आठव्या षटकातच अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड ( Travis Head ) यांनी संघाची धावसंख्या 100 च्या पुढे नेल्याने SRHची सुरुवात चांगली झाली. हैदराबादकडून ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक धावा केल्या. त्याने अवघ्या 39 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि 41 धावांच्या खेळीत 102 धावा केल्या. हेडने या काळात 9 चौकार आणि 8 षटकारही मारले. त्यानंतर हेनरिक क्लासेननेही तडाखेबाज खेळी केली त्याने 23 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. क्लासेनने 31 चेंडूंच्या खेळीत 2 चौकार आणि 7 षटकारांसह 67 धावा केल्या.

SRH ने पहिल्या 10 षटकांत 128 धावा केल्या होत्या आणि पुढच्या 10 षटकांतही धावगती कमी झाली नाही. 11व्या ते 20व्या षटकापर्यंत, हैदराबादच्या फलंदाजांनी 11व्या षटकानंतर एकही षटक सोडले नाही ज्यामध्ये 10 पेक्षा कमी धावा झाल्या. हैदराबादच्या डावाच्या सुरुवातीला अभिषेक शर्माने 22 चेंडूत 34 धावांचे योगदान दिले. शेवटी एडन मार्कराम आणि अब्दुल समद यांनी तुफानी फलंदाजी केली. एकीकडे मार्करामने 17 चेंडूत 32 धावा केल्या तर अब्दुल समदने 10 चेंडूत 37 धावांची शानदार खेळी केली.

IPL 2024 : एका IPL सामन्यातून चीअरलीडर्स किती कमावतात ? तुम्हालाही जाणून वाटेल आश्चर्य….

SRH ने शेवटच्या 5 षटकात 83 धावा काढत बेंगळुरूच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने 277 धावा केल्या होत्या, पण RCB विरुद्धच्या सामन्यात त्यांनी स्वतःचाच विक्रम मोडीत काढत 287 धावा करत हा विक्रम कायम राखला. हेडने 39 चेंडूत आपले शतक पूर्ण केले जे आयपीएलच्या इतिहासातील चौथे जलद शतक ठरले. फर्ग्युसनने हेडचा ( #TravisHead ) डाव संपवला. एकेकाळी संघ 300 धावा करेल असे वाटत होते, पण आधी हेड आणि नंतर क्लासेन बाद झाल्यामुळे हे शक्य झाले नाही.

IPL 2024 (RCB vs SRH Match 30) : ट्रॅव्हिस हेडचे आरसीबीविरुद्ध तुफान, एका जलद शतकी खेळीसह मोडीत काढले अनेक विक्रम…

आरसीबीच्या गोलंदाजांची चांगलीच केली धुलाई…

सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात आरसीबीच्या प्रत्येक गोलंदाजाला चांगलाच फटका बसला. लॉकी फर्ग्युसनने त्याच्या पुनरागमन सामन्यात निश्चितपणे 2 विकेट घेतल्या, परंतु 4 षटकात 52 धावा दिल्या. रीस टोपलीनेही एक विकेट घेतली, पण त्याने 4 षटकांत 68 धावा दिल्या. विजयकुमार विशाक आणि यश दयाल हे महागडे गोलंदाज ठरले. आणिने 4 षटकात 64 तर यशने 4 षटकात 51 धावा दिल्या.

Join our WhatsApp Channel
Tags: #TravisHeadIndian Premier League 2024IPL 2024IPL 2024 (RCB vs SRH Match 30)Live Cricket ScoreRCB vs SRHRCB vs SRH Match 30travis head
SendShareTweetShare

Related Posts

जम्मू-काश्‍मीरच्या सीमावर्ती जिल्ह्यांना मोठा दिलासा; लाल चौकात दुकाने उघडली, नागरिक घराबाहेर पडण्यास सुरुवात
latest-news

अग्रलेख : मोदींचा संदेश

May 14, 2025 | 6:00 am
Sofiya Qureshi
Top News

Sofiya Qureshi : सोफिया कुरेशींबद्दल ‘या’ नेत्याचं वादग्रस्त विधान; नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर…

May 13, 2025 | 10:55 pm
Pakistan Attack : लष्कर, बीएसएफच्या मदतीला सीआरपीएफही
latest-news

सीमाभागांत तोफगोळे निकामी करण्याची व्यापक मोहीम; लष्करी जवान आणि पोलीस सहभागी

May 13, 2025 | 10:39 pm
दोन दिवसांत बॉम्बस्फोट होईल.! पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा ईमेल
latest-news

दोन दिवसांत बॉम्बस्फोट होईल.! पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा ईमेल

May 13, 2025 | 10:13 pm
Vithoba Temple
Top News

Vithoba Temple : आता बीव्हीजी ग्रुप पुरवणार विठ्ठलाच्या मंदिराला सुरक्षा

May 13, 2025 | 9:40 pm
दहशतवादी होते भारतीय लष्करी गणवेशात; पूंछमध्ये जवानांकडून शस्त्रे हिसकावून हल्ला?
latest-news

Jammu Kashmir Attack : जम्मू-काश्‍मीरमध्ये सुरक्षा दलांनी ३ दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

May 13, 2025 | 9:36 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Pimpri : भाजपाच्या शहराध्यक्षपदी शत्रुघ्न काटे यांची निवड!

Pimpri : सव्वा वर्षात 550 अल्पवयीन मुलांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद

Pune : सरकारी नोकरी करणाऱ्या पत्नीची नाकारली पोटगी; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Pune : गैरप्रकार घडलेल्या ३७ केंद्रांची मान्यता चौकशीनंतर रद्द होणार

Pune : सदाशिव पेठेत मेडिकलमध्ये चोरी; ६४ हजारांची रोकड लंपास

Pune : उड्डाणपुलाला दोन आठवड्यातच भेग ?

Pune : अडीच किलोचा एक आंबा; कर्नाटकातून मार्केट यार्डात दाखल

Pimpri : निकृष्ट काम करणार्‍या ठेकेदारांकडून 34 लाख 72 हजार दंड वसुल

Pimpri : सैन्य दलात नोकरी देण्याच्या बहाण्याने 22.50 लाखांची फसवणूक

Pimpri : तळेगावमधील 5 मराठी शाळांचा निकाल 100 टक्के

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!