Lok Sabha Election 2024| उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघासाठी रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून शिंदे गटातील नेते रवींद्र वायकर यांच्या नावाची चर्चा होती. अखेर महायुतीकडून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंकडून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे आता अमोल कीर्तिकर विरुद्ध रवींद्र वायकर असा सामना रंगणार आहे.
उद्धव ठाकरे यांचे प्रचंड विश्वासू अशी वायकरांची ओळख होती. उद्धव ठाकरेंना ते शेवटपर्यंत सोडणार नाही अशी चर्चा होती. मात्र त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेसोबत आले. रविंद्र वायकर हे महिन्याभरापूर्वीच शिंदे गटात सामील झाले होते. रवींद्र वायकर यांच्यावर घोटाळ्याचे आरोप झाले होते. ईडीकडून त्यांची चौकशी झाली होती. त्यानंतर त्यांनी अचानक शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
लोकसभा निवडणूक – २०२४ साठी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून श्री रवींद्र वायकर यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा !#Shivsena pic.twitter.com/4Djv0JORaU
— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) April 30, 2024
अमोल किर्तीकर Vs रवींद्र वायकर Lok Sabha Election 2024|
दरम्यान, दुसरीकडे गजानन कीर्तिकर यांनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर अमोल कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. अमोल किर्तीकर हे गजानन किर्तीकर यांचे पुत्र आहेत. गजानन किर्तीकर हे शिवसेना शिंदे गटात आहेत. अमोल कीर्तिकर यांना ठाकरेंकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे रवींद्र वायकर यांच्यासोबत अमोल किर्तीकर यांची लढत होणार आहे.
रात्री चर्चा अन् सकाळी उमेवारी जाहीर Lok Sabha Election 2024|
दरम्यान, रवींद्र वायकर यांची रात्री उशीरापर्यंत एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घरी चर्चा सुरु होती. रवींद्र वायकर हे रात्री अडीचच्या सुमारास एकनाथ शिंदे यांच्या घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर आज सकाळी शिंदे गटाकडून रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
हेही वाचा:
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस; भूस्खलनामुळे अनेक घरांचे नुकसान, शाळा बंद