IPL 2024, Live Cricket Score (DC vs SRH Match 35) : आज आयपीएल 2024 च्या 35व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात चांगली कामगिरी करून गुणतालिकेत आपले स्थान मजबूत करण्याकडे दिल्ली आणि हैदराबादचे लक्ष असेल.
नाणेफेकीचा ( Toss ) कौल हा दिल्ली कॅपिटल्स संघाच्या बाजूनं लागला आहे. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ( Delhi Capitals win the toss and elect to field against Sunrisers Hyderabad ) त्यामुळे टाॅस हरल्यानंतर आता हैदराबादचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे.
ट्रॅव्हिस हेड #TravisHead आणि अभिषेक शर्मा यांनी सनरायझर्स हैदराबादला पुन्हा एकदा शानदार सुरुवात करून दिली. दोन्ही फलंदाजांनी तुफानी फलंदाजी केली आणि पाच षटकांअखेर धावसंख्या बिनबाद 103 धावांपर्यंत पोहोचवली आहे.
FIVE OVERS into the innings…
💯 partnership is up between the #SRH openers 🧡
Follow the Match ▶️ https://t.co/LZmP9Tevto#TATAIPL | #DCvSRH pic.twitter.com/P7AMGyGdF2
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2024
ट्रॅव्हिस हेड ( Travis Head ) 20 चेंडूत 62 धावांवर खेळत आहे. त्याने 7 चौकार आणि 5 षटकार मारले आहेत. तर अभिषेक शर्मा 10 चेंडूत 40 धावांवर खेळत आहे. त्याच्या बॅटमधून 2 चौकार आणि 5 षटकार आले आहेत.
दरम्यान, आयपीएलमध्ये आतापर्यंत 23 सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने आले आहेत. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्स (DC) ने 11 सामने जिंकले आहेत, तर सनरायझर्स हैदराबाद (SRH) ने 12 सामन्यात विजयाची चव चाखली आहे. तसेच आयपीएलच्या इतिहासात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर एकूण 85 सामने खेळले गेले आहेत. यापैकी 38 सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने आणि 46 दुसऱ्या सामन्यात फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत तर एका सामन्याचा निकाल लागला नाही.