IPL 2024 Auction : भारतातील सर्वांत लोकप्रिय प्रिमिअर लीग अर्थात इंडियन प्रिमिअर लीग-2024 चा (आयपीएल) लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे. त्यात अनेक खेळाडूंचे नशीब चमकणार असले तरी काही खेळाडू असे असतील ज्यांना घोर निराशेचा सामना करावा लागणार आहे. आम्ही तुम्हाला अशाच काही भारतीय खेळाडूंबद्दल सांगणा आहोत, जे ‘या’ लिलावात ‘Unsold’ राहू शकतात. विशेष म्हणजे या यादीत एक असा खेळाडू आहे ज्याने एका हंगामात सर्वाधिक विकेट घेत पर्पल कॅपही जिंकली होती.
1. केदार जाधव
आरसीबीने गेल्या वर्षी या भारतीय खेळाडूला आपल्या संघात ठेवले होते, मात्र यावर्षी फाफ डुप्लेसिस आणि विराट कोहलीच्या संघाने या खेळाडूला सोडले आहे. मधल्या फळीतील फलंदाजीसोबतच केदार जाधव फिरकी गोलंदाजीही करतो. मात्र, गेल्या अनेक आयपीएल सामन्यांमधली त्याची कामगिरी निराशाजनक राहिली असून, त्याची मूळ किंमतही 2 कोटी रुपये आहे, त्यामुळे या लिलावात केदार जाधव हा ‘Unsold’ राहू शकतो, अशी शक्यता आहे.
2. सर्फराज खान
सर्फराज खानने जेव्हा आयपीएलमध्ये पदार्पण केले तेव्हा तो आयपीएल खेळणारा सर्वात तरुण खेळाडू होता, पण त्याची आयपीएल कारकीर्द चांगली राहिली नाही. सर्फराजने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप धावा केल्या आहेत, तसेच अनेक देशांतर्गत हंगामातही त्याने चांगली कामगिरी केली आहे. याच कामगिरीच्या जोरावर सर्फराज गेल्या अनेक मोसमात दिल्ली कॅपिटल्स संघातही होता, पण आयपीएलमध्ये त्याला गेल्या काही सामन्यांमध्येच नव्हे तर गेल्या काही मोसमात चांगली कामगिरी करता आलेली नाही. अशा स्थितीत सर्फराज खानही या लिलावात ‘Unsold’ राहू शकतो, हे निश्चित दिसते.
3. हर्षल पटेल
आरसीबीसाठी डेथ ओव्हर स्पेशालिस्ट बनलेल्या या मध्यमगती गोलंदाजाने एका मोसमात सर्वाधिक विकेट्स घेऊन पर्पल कॅपही जिंकली. त्या कामगिरीच्या जोरावर आरसीबीने हर्षलला गेली अनेक वर्षे आपल्यासोबत ठेवले आणि जवळपास प्रत्येक सामन्यात त्याच्यावर विश्वास व्यक्त केला, पण हर्षल पटेल हा आरसीबीसाठी अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. हर्षलच्या चेंडूंचे रहस्य फलंदाजांना समजले आहे आणि त्यामुळेच त्याच्या चेंडूंवर अनेक धावा झाल्या आहेत. अशा स्थितीत हर्षल पटेल यांना याला खरेदीदार मिळणे कठीण आहे.
4. मनन वोहरा
भारताच्या या सलामीवीराची अवस्थाही अशीच आहे. मनन वोहरा हा एक अतिशय हुशार सलामीवीर मानला जातो आणि अनेक वेळा या खेळाडूने चांगली खेळी केली आहे, परंतु त्याच्या खेळात सातत्य नाही, त्यामुळे त्याला रिलीज करण्यात आले आहे. त्यामुळे यावेळी तोही ‘Unsold’ राहू शकतो, हे निश्चित दिसते. गेल्या हंगामात लखनौ सुपर जायंट्स संघात मनन वोहराचा समावेश करण्यात आला होता.
ICC T20 Ranking : टी-20 क्रिकेटला मिळाला गोलंदाजीचा नवा बादशाह…
5. जयदेव उनादकट
या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाची अवस्था सरफराज खानसारखीच आहे. सरफराज खान देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप धावा करतो, तर जयदेव उनादकट देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप विकेट घेतो, पण आयपीएलमध्ये त्याची कामगिरी तितकी चांगली नाही. एकेकाळी त्याच्या नावावर सर्वात मोठी बोली लावली गेली होती, पण त्याची कामगिरी चांगली झाली नाही. यावेळी मुंबई इंडियन्सने त्याला रिलीज केले आहे आणि कदाचित त्याला नवीन खरेदीदार सापडणार नाही.