Hasan Mushrif : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कर्जतमध्ये शरद पवार यांच्यासह अनेक गोष्टींचा मोठा खुलासा केला आहे. यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडली आहे. यावरून सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यातच आता वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी अजित पवारांनी जे सांगितलं ते वस्तूस्थितीला धरून असल्याचे म्हटले आहे. यावेळी त्यांनी अनिल देशमुख यांच्या मंत्रीपदाबाबत देखील भाष्य केले आहे.
हसन मुश्रीफ म्हणाले की, आमच्यासोबत अनिल देशमुखही होते. नंतर त्यांनी नकार दिला, त्यांनी इतकं खोटं बोलू नये. अजितदादांना सुपारी द्यायचा प्रश्न येत नाही. प्रफुल्ल पटेल यांनी सविस्तर सांगितलं आहे. अजित पवारांनी जे सांगितलं ते वस्तूस्थितीला धरून असल्याचे म्हटले आहे. शरद पवार का नकार देत आहेत हे अजित पवार यांना कळलेलं नाही, मग आम्हाला कसं कळणार? असेही मुश्रीफ म्हणाले.
हसन मुश्रीफ यांनी आगामी लोकसभेला बारामती लढणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, “आता जिथं आमचे खासदार आहेत त्या जागा आम्हीच लढवणार आहोत. यामध्ये बारामती लोकसभेचाही समावेश आहे. मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे, म्हणून राजकीय भूमिकेत प्रामाणिक रहावं लागेल.”, असेही त्यांनी सांगितले.
एक नवीन पक्ष काढा. नवीन निशाणी घ्या आणि स्वत:च कर्तुत्व सिद्ध करुन दाखवा, असं आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत अजित पवार यांना दिलं. त्यावर मुश्रीफांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्या पक्षात इतकी वर्ष काम केलं तो पक्ष सोडून दुसरा पक्ष कसा काढणार? जो पक्ष कष्ट करून वाढवला त्याबद्दल वेगळ्या भावना असतात, असं मुश्रीफ म्हणाले आहेत.