नवी दिल्ली : मोदींना केवळ पंतप्रधान म्हणून नव्हे तर समाजसुधारक म्हणूनही पाहण्याची गरज असल्याचे मत संबित पात्रा यांनी आज व्यक्त केले आहे.पक्षाच्या मुख्यालयात पत्रकारांना संबोधित करताना भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा बोलत होते.
भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना आज चक्क महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी समाजातील विविध घटकांच्या हितासाठी केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा उल्लेख केला.
नरेंद्र मोदींना केवळ पंतप्रधान म्हणून नव्हे तर समाजसुधारक म्हणूनही पाहण्याची गरज असल्याचे पात्रा यांनी म्हटले आहे. पक्षाच्या मुख्यालयात पत्रकारांना संबोधित करताना भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, गेली आठ वर्षे भारताच्या राजकारणात अतिशय महत्त्वाची आणि दिशा ठरवणारी वर्षे आहेत.
यापूर्वीही दिल्ली निवडणुकीच्या काळात मोदी यांची तुलना भाजपने छत्रपती शिवरायांबरोबर केल्याने वाद उद्भवला होता. पात्रा यांना आज मोदी यांची तुलना महात्मा फुले यांच्याशी करण्याचा मोह आवरला नाही. मोदी हेही महात्मा फुलेंप्रमाणे अविरत काम करतात.
ज्याद्वारे महिलांचे सशक्तीकरण होऊ शकेल व मागासवर्गीय लोक पुढे जावेत.
महात्मा ज्योतिबा फुले जसे समाज सुधारक आहेत तसेच मोदीही समाज सुधारकांप्रमाणे दिवसभर परिश्रम करतात, असे संबीत पात्रा यांनी म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये. मोदींना समाज सुधारक या रूपात पाहण्याचीही आवश्यकता आहे, असेही संबीत पात्रा यांनी म्हटले आहे.