fbpx

संगीतकार महेश कनोडिया यांचे निधन, मोदींनीही शोक व्यक्त केला

गुजरात – गुजरातचे सुप्रसिद्ध चित्रपट संगीतकार आणि पाटण लोकसभेचे भाजपचे माजी खासदार ‘महेश कनोडिया’ यांचे काल (रविवारी) निधन झाले. कनोडिया यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वाला आणखी एक धक्का बसला आहे.

कनोडिया बर्‍याच दिवसांपासून आजारी होते. दीर्घ आजारानंतर गांधीनगर येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 83 वर्षांचे होते. महेश कानोडीया यांच्या आवाजानं संपूर्ण देशालाच भुरळ घातली होती.

दरम्यान, महेश कनोडिया यांच्या मृत्यू नंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा सोशल मीडियावरून कनोडिया यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “महेश कनोडिया यांच्या नि.धनाचं खुप दुःख झालं. ते एक अष्टपैलू आणि प्रतिभावान गायक होते. त्यांना लोकांचं भरभरून प्रेम मिळालं. एक राजकारणी म्हणूनही ते गरीब व मागासांच्या सक्षमीकरणासाठी समर्पित राहिले. मी हितू कनोडिया यांच्याशी बोलून महेश कनोडिया यांच्या नि.धनाचं दुःख व्यक्त केलं”. या आशयाचे ट्विट मोदींने केले  आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.