दिल्लीत मॉडेलिंग, हिंजवडीत वेश्‍या व्यवसाय

चार तरुणींची सुटका : व्यवसाय चालवणाऱ्या पाच जणांना अटक

पिंपरी – दिल्लीमध्ये मॉडेलिंग करीत असलेल्या तरुणींना शहरात आणून त्यांच्याकडून वेश्‍याव्यवसाय करविणाऱ्या सेक्‍स रॅकेटचा हिंजवडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी गुरुवारी रात्री दहा वाजता मारुंजी येथील एका अर्पामेंटमध्ये छापा टाकून पाच जणांना अटक करुन चार तरुणीची सुटका केली आहे. हा प्रकार मुळशी तालुक्‍यातील मारुंजी येथील लाईफ रिपब्लिक सोसायटीमध्ये सुरु होता.

आर्यन उर्फ विश्‍वास बळीराम सावरगावकर (वय-34, रा. शिवतिर्थ नगर, कोथरुड), नितीन शरद भालेराव (वय-25 रा. प्रकाश नगर, लातूर), अभय सज्जनराव शिंदे (वय-25, रा. शिवाजी चौक, लातुर), मयूर गणेश शर्मा (वय-28, रा. भोपाल, मध्यप्रदेश), दिलीप भगीरथ मंडल (वय-24 रा. नालासपोरा इस्ट, वसई, पालघर) यांना पोलिसांनी अटक केली असून या सर्वांवर भादंवि कलम 370, 370 (अ) सह पिटा कायदा 3,4,5,6,7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळच्या दिल्ली, बिहार, छत्तीसगड तसेच नालासपोरा येथील असून दिल्लीमध्ये शिक्षण घेत होत्या व सोबतच मॉडेलिंग करत होत्या. णाऱ्या तरुणींकडून वैश्‍याव्यवसाय करुन घेतला जात होता. सुटका करण्यात आलेल्या तरुणींपैकी एक तरुणी इव्हेंट मॅनेजमेंटचा कोर्स करीत आहे. या तरुणींना आरोपींनी ज्यादा पैशाचे आमिष दाखवून देहव्यापाराच्या दलदलीत ढकलले. त्यांच्याकडून मारुंजी येथील सोसायटीच्या फ्लॅटमध्ये हे काम करुन घेतले जात होते. यातून मिळणारी काही रक्कम या तरुणींना देऊन उर्वरीत रक्कम आरोपी स्वतः घेत होते. या वेश्‍याव्यवसायाबद्दल हिंजवडी पोलिसांना खबरीकडून माहीती मिळाली.

त्यावरुन हिंजवडी पोलिसांनी दि. 6 जून रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास लाईफ रिपब्लिक सोसायटीमधील या फ्लॅटवर छापा टाकला असता या तरुणी मिळून आल्या. त्यांची पोलिसांनी आरोपीच्या तावडीतून सुटका केली असून आरोपींना अटक केली आहे. या आरोपींना न्यायालयाने गुरवार दि. 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.