भारतामध्ये मोबाइल पेमेंट आता अधिक लोकप्रिय

मुंबई – पैसे देण्यासाठी रोख रक्कम व कार्ड यांना अजूनही पसंती दिली जात असली तरी मोबाइल पेमेंटचे प्रमाण झपाट्याने वाढते आहे, प्रामुख्याने बॅंकांचे मुख्य ग्राहक असणाऱ्या तरुण वर्गामध्ये ते अधिक दिसून येते. मोबाइल पेमेंट अवलंबण्याच्या बाबतीत भारताने अमेरिका, यूके व जर्मनी यांना बरेच मागे टाकले आहे, असे एफआयएस या वित्तीय सेवा तंत्रज्ञानातील कंपनीने आपल्या अभ्यास अहवालात म्हटले आहे.

सोय व युजर-फ्रेंडली इंटरफेस, तसेच सातत्याने सुधारणारी, कमी खर्चिक मोबाइल डाटा कनेक्‍टिविटी व मर्चंटकडून स्वीकार यामुळे मोबाइल पेमेंटची लोकप्रियता वाढते आहे. कॅश बॅक व अन्य सवलती देणाऱ्या मोबाइल वॉलेटचे अवलंब करण्याचे प्रमाणही वाढते आहे. मर्चंटसाठी यूपीआय 2.0 वरदान ठरत आहे, कारण त्यामुळे ओव्हरड्रीफ्ट अकाउंट व पेमेंटपूर्ण इनव्हॉइसचे व्हेरिफिकेशन या बाबतीत मदत होत आहे, लहान व मध्यम कंपन्यांच्या श्रेणीमध्येही मोबाइल पेमेंट पसंतीची ठरू लागली आहेत.

आघाडीच्या 50 बॅंका व खासगी बॅंकांचे ग्राहक 2018 च्या तुलनेत कमी समाधानी होते. संथपणे प्रतिसाद देणाऱ्या सार्वजनिक बॅंकांनी आपल्या कामगिरीत सुधारणा करून अत्यंत समाधानी ग्राहक हा टप्पा साध्य केला, असे भारतातील एफआयएसचे व्यवस्थापकीय संचालक रामस्वामी व्यंकटचलम यांनी सांगितले. स्मार्टफोनची संख्या वाढत असल्यामुळे आगामी काळातही मोबाइल पेमेंट वाढेल. तसेच हे तंत्रज्ञान उत्क्रांत होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.