रेमंडही गृहनिर्माण उद्योगात

मुंबईजवळ मेगा सिटी उभारण्याचे शिवधनुष्य उचलणारी रिलायन्स कंपनीशिवाय देशातील अन्य दिग्गज कंपनी रेमंड देखील रिअल इस्टेट क्षेत्रात पाऊल टाकणार आहे. रेमंड ग्रुपने रिअल इस्टेट क्षेत्रात उतरण्यासाठी रेमंड रिअल नावाने कंपनी स्थापन केली आहे. कंपनीचे चेअरमन तसेच कार्यकारी संचालक गौतम हरी सिंघानिया यांच्या म्हणण्यानुसार शेअरधारकांचे मूल्य आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात असून त्यानुसार ठाण्याजवळ जमीन खरेदी केली आहे. तेथे रिअल इस्टेटच्या व्याप्तीसाठी भरपूर संधी असून पैसा कमावण्यासाठी या क्षेत्रात पाऊल टाकले असल्याचे म्हटले आहे.

रेमंडच्या गृहप्रकल्पाच्या योजनेच्या पहिल्या टप्प्यात दहा टॉवरमध्ये राहण्यासाठी 3 हजार इमारती तयार केल्या जातील. पहिल्या टप्प्यात रेमंड रिअल्टी 3500 कोटी रुपयांचा कारभार करेल आणि पाच वर्षांच्या कालावधीत या उलाढालीतून 25 टक्‍क्‍यांहून अधिक लाभ मिळेल, असा अंदाज आहे. 1927 पासून आतापर्यंत द कंप्लिट मॅनच्या टॅगलाइनने कपड्यांची निर्मिती करणारी कंपनी रेंमड आता फ्लॅट तयार करून त्याची विक्री करणार आहे. यापूर्वी गोदरेज, टाटा सन्स यासारख्या जुन्या कंपन्यांनी रिअल इस्टेटमध्ये पाऊल टाकले होते. सध्या हे क्षेत्र कर्जबाजारी आणि आर्थिक अडचणींचा सामना करत करत असताना नवीन कंपन्यांचे आगमन लाभदायक ठरेल, अशी आशा आहे. रिअल इस्टेट कंपनी या क्षेत्रात दमदार कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे. पहिल्या योजनेंतर्गत दहा टॉवरमध्ये टू बिएचकेचे 3 हजार फ्लॅटची निर्मिती केली जाणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.