मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये ‘महामोर्चा’चं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुंबईतील हिंदू जिमखाना येथून ‘मन’सैनिकांनी आपल्या ‘नव्या’ झेंड्यासह आझाद मैदानाकडे कूच केली. आझाद मैदानावर पक्षाध्यक्ष राज ठाकरेंच्या भाषणानंतर या मोर्चाचा समारोप झाला. आजच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चाला मनसैनिकांनी उदंड प्रतिसाद दिल्याने शिवमुद्रा असलेल्या ‘भगव्या’ रंगाच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झेंड्यांनी मुंबईचे रस्ते फुलून गेले होते. मनसैनिकांनी रस्ते व्यापल्याने धावत्या मुंबईची गती मात्र काही वेळासाठी मंदावली होती.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आजच्या या महामोर्चाची टिपलेली काही क्षणचित्रे… (सर्व छायाचित्रं पीटीआय)