काठमांडू (नेपाळ) : नेपाळचा १५ वर्षीय युवा फलंदाज कुशल मल्ला याने शनिवारी आंतरराष्ट्रीय पुरूष एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वांत कमी वयात अर्धशतक झळकवण्याचा विक्रम नोंदवला.
A fighting knock on ODI debut from Nepal's 15-year-old Kushal Malla!
After a shaky start, he steadied the proceedings with Binod Bhandari before Karima Gore had him dismissed for 50.
Follow #CWCL2 live: https://t.co/SqyWqjiEjR#RoadToCWC23 pic.twitter.com/Tnld7KB868
— ICC (@ICC) February 8, 2020
आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप लीग-२ स्पर्धेत अमेरिकेविरूध्दच्या सामन्यात १५ वर्षे ३४० दिवस इतके वय असणा-या कुशलने सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना ४९ चेंडूत शानदार अर्धशतक लगावले. सर्वात कमी वयात अर्धशतक झळकवण्याचा विक्रम नेपाळच्याच रोहित कुमार पौडेलच्या नावावर होता.
नेपाळच्या रोहित कुमार पौडेल याने १६ वर्षे १४६ दिवस इतक्या वयात अमेरिकाविरूध्दच अर्धशतक झळकावले होते. या विक्रमच्या बाबतीत कुशल याने पाकिस्तानच्या शाहिद अफरीदी आणि भारताच्या सचिन तेंडूलकरला मागे टाकले. अफरीदीने १६ वर्षे २१७ दिवस तर सचिनने १७ व्या वर्षी अर्धशतक लगावले होते.