वाघोली (प्रतिनिधी) – नुकत्याच झालेल्या पावसामुळे रस्त्यांची झालेली दुरवस्था व नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी वाघोली (ता. हवेली) येथे भेट देत पाहणी केली.
आमदार पवार यांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत विविध ठिकाणच्या पावसामुळे निर्माण झालेल्या समस्यांची भेट देत पाहणी करून तातडीने नागरिकांची समस्या सोडवण्यासाठी रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्याबाबतचे आदेशही दिले. यावेळी रेनबो ग्लोरी सोसायटी, साई पार्क सोसायटी आव्हळवाडी, ऑक्सि सोसायटी, रायसोनी समोर, ऐश्वर्य लक्ष्मी सोसायटी, बस डेपोच्या मागील बाजू, ऑक्सि अलटीमा सोसायटी,
वाघोली लोहगाव रोडचे खड्डे, आदी भागात भेटी देत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
पुणे: शिक्षिका पत्नीने पोटगीसाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब सातव पाटील, सरपंच वसुंधरा उबाळे, माजी सरपंच शिवदास उबाळे, सुनील जाधवराव, गणेश सातव पाटील व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
शेती, पिण्याच्या पाण्याची समस्या टळली; राज्यभरातील धरणांमधील पाणीसाठ्यात दुपटीने वाढ
वाघोलीतील पावसामुळे निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू आहेत.लवकरच नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात येईल.
– राजेंद्र सातव पाटील, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस