पुणे – कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणेच्या उपसचिवपदी नितीन रासकर यांची, तर गुळ-भुसार विभागाच्या अध्यक्षपदी प्रशांत गोते यांची निवड झाली आहे. प्रशासक मधुकांत गरड यांनी ही नियुक्ती केली. रासकर हे मागील 36 वर्षांपासून बाजार समितीत कार्यरत असून, मागील चार वर्षांपासून ते गुळ-भुसार विभागाचे प्रमुख होते.
गोते हे मागील काही वर्षांपासून भुसार विभागात कार्यरत होते. बढती मिळाल्याचा आनंद वाटत असल्याचे रासकर यांनी निवडीनंतर सांगितले. तर, भुसार बाजारातील उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे गोते यांनी म्हटले आहे.