शेती, पिण्याच्या पाण्याची समस्या टळली; राज्यभरातील धरणांमधील पाणीसाठ्यात दुपटीने वाढ

मुंबई – जुलैमध्ये महाराष्ट्राच्या बहुतांश भागात झालेल्या मुसळधार पावसाने गेल्या पंधरवड्याच्या कालावधीत राज्यभरातील धरणांमधील सामूहिक पाणीसाठ्यात दुपटीने वाढ झाली आहे. जून महिन्यात राज्यातील बहुतांशी धरणे कोरडी पडली होती. त्यामुळे शेती तसेच पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण होण्याचा धोका होता. पण तो आता टळला आहे.
राज्याच्या जलसंपदा विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार 1 जुलै रोजी धरणांमधील पाणीसाठा एकूण साठवण क्षमतेच्या 24.07 टक्के असताना शुक्रवारी सायंकाळी तो 53.73 टक्क्यांवर पोहोचला. कोकण, पश्चिम महाराष्ट्राचा बहुतांश भाग, मराठवाडा, विदर्भ आणि राज्यातील इतर भागांत मुसळधार पावसाने धरणांमधील पाणीसाठा वाढला असून अनेक छोटे जलाशयही ओसंडून वाहत आहेत.
“गुजरात नरसंहाराच्या प्रकरणातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठीच अहमद पटेल यांच्यावर खोटे आरोप”
जूनचा महिना केवळ काही तुरळक पावसाने कोरडा राहिला, परंतु जुलैच्या मागील एका आठवड्यात पावसाची तीव्रता वाढली, ज्यामुळे या अल्पकालावधीत पाणीसाठा 16 टक्क्यांहून अधिक वाढला, असे या तपशिलात नमूद करण्यात आले आहे. चालू वर्ष आणि मागील वर्षांच्या तुलनात्मक आकडेवारीवरून असे दिसून येते की, यावर्षी पाणीसाठा केवळ जास्तच नाही, तर तो अधिक वेगाने वाढला आहे. मागील एका आठवड्यातील जोरदार पाऊस हे त्यामागचे एकमेव कारण आहे, असे जलसंपदा विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
युक्रेनवर रशियाचे नव्याने जोरदार हल्ले सुरू; मोठ्या प्रमाणावर जीवितहानी





