उबाळे कुटुंबियांचे कार्य कौतुकास्पद; शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांचे गौरवोद्गार

वाघोली: वाघोलीचे माजी सरपंच शिवदास उबाळे, वाघोली च्या सरपंच वसुंधरा उबाळे व त्यांच्या कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा हेतूने राबवलेल्या विविध उपक्रमांतून सामाजिक जाणीव वृद्धिंगत होत असून असा आदर्श सर्वांनी निर्माण करावा असे गौरवोद्गार शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी काढले.

आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्रचिकित्सा शिबिर व इतर कार्यक्रम उबाळे कुटुंबियांच्या वतीने घेण्यात आले होते. यातील नेत्र तपासणी करून जवळपास 776 नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप कार्यक्रम शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आला होता.

याप्रसंगी वाघोली चे सरपंच वसुंधरा उबाळे, माजी सरपंच शिवदास उबाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, संदेश आव्हाळे, सुनील जाधवराव, सोपान गोरे, दत्तात्रेय कटके, बाळासाहेब सातव पाटील, सामाजिक कार्यकर्त्या ज्योती पाचरणे आदी ग्रामस्थ व महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.

यावेळी माजी सरपंच शिवदास उबाळे यांनी सांगितले की नेत्र चिकित्सा करून ज्या ज्या नागरिकांना ऑपरेशन करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे अशा नागरिकांचे मोफत ऑपरेशन देखील उबाळे कुटुंबियांच्या वतीने करण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.