Michaung Cyclone : ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळाने तमिळनाडूत हाहाकार घातल्यानंतर हे वादळ आज आंध्र प्रदेशमधील बापटलाजवळ धडकणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये गुलाब चक्रीवादळ आले होते, त्यानंतर दोन वर्षांत किनारा ओलांडणारे ‘मिचॉन्ग’ हे पहिले वादळ ठरले आहे.
दरम्यान, ‘मिचॉन्ग’च्या वाऱ्याचा वेग तीव्र चक्रीवादळाच्या पातळीपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. ९०-१०० किमी प्रतितास असा स्थिर वेग ११० किमी प्रतितास आहे. हवामान प्रणाली ७ डिसेंबरपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर ते डीप डिप्रेशनमध्ये बदलेल असे हवामान विभागाने म्हटले आहे.
पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात तयार झालेले हे वादळ दक्षिण आंध्र प्रदेश किनार्यापासून आणि लगतच्या उत्तर तामिळनाडू किनार्यावर धडकणार असून गेल्या सहा तासांत सात किमी प्रतितास वेगाने उत्तर-वायव्य दिशेने हे वादळ सरकले आहे. आज पहाटे २.३० वाजता नेल्लोरच्या २० किमी उत्तर-ईशान्येस, चेन्नईच्या १७० किमी उत्तरेस, बापटलापासून १५० किमी दक्षिणेस आणि मछलीपट्टनमच्या २१० किमी दक्षिण-नैऋत्येस मध्यभागी वादळाची दिशा होती.
मिचौंग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशातील जिल्हाधिकारी हाय अलर्टवर आहेत. कारण, ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळ नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यान जमिनीवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे खबरदारीचा उपाय केला जात आहे. दरम्यान, दक्षिण भारतात धुमाकूळ माजवलेल्या या ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळामुळे दक्षिणेतील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.