Entertainment : दाक्षिणात्य सुपरस्टार यश (Yash) याचा मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या स्टाइल आणि अभिनयाने त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. यशचे ‘केजीएफ 1’ आणि ‘केजीएफ 2’ या दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले होते. त्यानंतर आता चाहते त्याच्या नव्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यातच आता येत्या 8 डिसेंबर यश त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या माहितीनंतर यश ‘केजीएफ 3’ मध्ये दिसणार असल्याची शक्यता काहींनी वर्तवली आहे. यशच्या नवीन चित्रपट ‘यश 19’ची निर्मिती केव्हीएन प्रॉडक्शनद्वारे केली आहे. यशने स्वतः त्याच्या चित्रपटाचे अपडेट चाहत्यांशी शेअर करत चित्रपटाचे शीर्षक 8 डिसेंबर रोजी जाहीर करणार आहे. यशने त्याच्या इंस्टाग्रामवर त्याच्या नवीन प्रोजेक्टचा फोटो शेअर करत लिहिले, ‘वेळ आली आहे. 8 डिसेंबर रोजी रात्री 9.55 वा. केव्हीएन प्रॉडक्शनशी संपर्कात रहा.’
View this post on Instagram
त्याच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. यशच्या आणखी एका नव्या चित्रपटाची चाहते देखील आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याच्या या पोस्टवर एका चाहत्याने लिहिले की, ‘संपूर्ण भारत वाट पाहत आहे. सलाम रॉकी भाई.’ यशचा हा नवीन चित्रपट गीतू मोहनदास दिग्दर्शन करणार आहे.