MI vs RR Live Score : मुंबईने दिलेल्या १२५ रन्सच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थानची सुरुवात देखील मुंबई प्रमाणे खराब झाली. यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलरने राजस्थानच्या डावाची सुरुवात केली. राजस्थानने पहिल्या ४ विकेट्स लवकर गमावल्याने सामन्यात काहीवेळ चुरस निर्माण झाली होती मात्र अखेर राजस्थानने ही मॅच सहा विकेट्सने जिंकली.
क्वेन मफाकाने यशस्वीला पहिल्याच ओव्हरमध्ये आऊट करत मुंबईला पहिली विकेट मिळवून दिली. त्यानंतर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन 12 धावा करून बाद झाला. आकाश मधवालने त्याला आपला शिकार बनवले आणि राजस्थान चांगलीच अडचणीत आली. त्यानंतर पराग आणि बटलर मैदानात खेळात होते. सहा ओव्हर्समध्ये राजस्थानने २ विकेट्स गमावून बोर्डावर ५० रन्स लावले. | MI vs RR Live Score
जोस बटलरच्या रूपाने राजस्थानला तिसरा धक्का बसला. 13 धावा करून त्याला आकाश मधवालने आऊट केले. त्यावेळी राजस्थानने बोर्डावर अवघे पन्नास रन्स लावले होते. राजस्थानला चौथा धक्का रविचंद्रन अश्विनच्या रूपाने बसला जो 16 धावा करण्यात यशस्वी ठरला. 13 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर आकाश मधवालने तिलक वर्माकरवी त्याला झेलबाद केले. अश्विनने रियान परागसोबत चौथ्या विकेटसाठी 40 धावांची भागीदारी केली. | MI vs RR Live Score
चार विकेट्स गेल्यानंतर परागने शानदार बॅटिंग करत आपली फिफ्टी पूर्ण केली (५४*) आणि टीमला 15.3 ओव्हर्समध्येच विजय मिळवून दिला. आयपीएलच्या या 14 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर सहा गडी राखून विजय मिळवत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आणि सहा गुणांसह गुणतालिकेत पहिले स्थान गाठले. त्याचबरोबर मुंबईला या स्पर्धेत आतापर्यंत पहिला विजय मिळवता आलेला नाही आणि ती 10व्या स्थानावर आहे. | MI vs RR Live Score
🔙 to🔙 half-centuries for Riyan Parag
He continues his good form with the bat 👏👏
Watch the match LIVE on @JioCinema and @StarSportsIndia 💻📱#TATAIPL | #MIvRR | @rajasthanroyals pic.twitter.com/tAnDaCghYm
— IndianPremierLeague (@IPL) April 1, 2024