पुणे – आज, IPL 2022 च्या 23 व्या सामन्यात, पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर, पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा सामना पंजाब किंग्जशी होत आहे. मुंबईचा संघ चारही सामने हरला आहे. आजचा पहिला सामना जिंकण्यासाठी संघ मैदानात उतरला आहे. त्याचबरोबर पंजाबच्या संघाने आतापर्यंत चार सामने खेळले असून दोन जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने टाॅस (नाणेफेक) जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार रोहितने संघात एक बदल केला आहे. फलंदाज रमणदीपच्या जागी गोलंदाज टायमल मिल्सचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर पंजाब किंग्सचा कर्णधार मयंक अग्रवालने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही.
Captain Rohit Sharma wins the toss and #MumbaiIndians will bowl first against #PBKS.
Live – https://t.co/QpRklNl6wU #MIvPBKS #TATAIPL pic.twitter.com/mtE46j57TP
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2022
मुंबईचा संघ तीन परदेशी खेळाडूंसह मैदानात उतरला आहे. हे तीन खेळाडू आहेत – डेवाल्ड ब्रेव्हिस, किरॉन पोलार्ड आणि टायमल मिल्स. त्याचबरोबर पंजाबच्या संघात जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, ओडियन स्मिथ आणि कागिसो रबाडा हे चार विदेशी खेळाडू आहेत.
पंजाब किंग्ज : मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, ओडियन स्मिथ, शाहरुख खान, कागिसो रबाडा, राहुल चहर, वैभव अरोरा, अर्शदीप सिंग.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, जयदेव उनाडकट, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बेसिल थम्पी.