नवी दिल्ली – हिमाचल प्रदेशातील भाजपचे एक ज्येष्ठ नेते हरमेल धीमान यांनी आज आपल्या समर्थकांसह आम आदमी पक्षात प्रवेश केला. ते भाजपच्या अनुसुचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य होते.
हिमाचल प्रदेश भाजप मधील अन्य दोन नेत्यांनीही आज आम आदमी पक्षात प्रवेश केला. देवराज आणि जगदीश पवार अशी त्यांची नावे आहेत. या संबंधात पत्रकारांशी बोलताना दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन म्हणाले की हिमाचलातील आणखीही काही नेते लवकरच आमच्या पक्षात प्रवेश करणार आहेत.
धीमान यांचे पक्षात स्वागत करताना ते म्हणाले की भाजपच्या धोरणांना कंटाळून त्यांनी आमच्या पक्षात प्रवेश केला आहे. गेली 30 वर्ष ते भाजप मध्ये काम करीत होते. आपण लवकरत कसौली येथे जाणार असून तेथील एक हजार भाजप कार्यकर्ते आमच्या पक्षात सहभागी होणार आहेत अशी माहितीही त्यांनी दिली आहे.