मुंबई – लाडक्या अधिकाऱ्यांवर सरकारडून पैशाची उधळपट्टी सुरू आहे. यात एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करत 5 सेवानिवृत्त अधिकारी वर्गांस विशेष कार्य अधिकारी ( OSD ) म्हणून नेमले आहे. प्रत्येक महिन्याला या अधिकाऱ्यांना 12 लाख रुपये वेतन दिले जात आहे, असे माहिती अधिकारातून उघडकीस आले आहे.
यासंदर्भात आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना एमएमआरडीए प्रशासनाने माहिती दिली आहे. तसेच 10 हजार पेक्षा अधिक मानधन नसावे, या मार्गदर्शक तत्वांस बगल देत शासनाची परवानगी न घेणाऱ्या आयुक्तांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी अनिल गलगली यांनी केली आहे.
एमएमआरडीए मुख्यालयात विभाग प्रमुख हे सर्वोच्च पद असताना त्यांच्यावर सेवानिवृत्त असलेले विशेष कार्य अधिकारी यांची नेमणूक करत प्रत्येक महिन्याला 12 लाखांचा खर्च केला जात आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीए प्रशासनाकडे एमएमआरडीए महानगर आयुक्त यांच्या अनुमतीने नेमणूक करण्यात आलेल्या विशेष कार्य अधिकारी यांची माहिती मागितली होती. एमएमआरडीए प्रशासनाने अनिल गलगली यांस 5 सेवानिवृत्त अधिकारी ज्यांची वर्णी विशेष कार्य अधिकारी लावली गेली आहे, त्याची माहिती उपलब्ध करुन दिली. यात जर 5 अधिकारी आहेत त्यात सुनील गुज्जेलवार, केशव उबाळे, व्ही वेणूगोपाल, डॉ महेश ठाकूर, अरविंद देशभ्रतार आहेत.
दरम्यान, एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त- 2 यांच्या मान्यतेने सुनील गुज्जेलवार यांस जेतवन येथील 1824 चौरस फुटांची सदनिका देण्यात आली आहे, तर अरविंद देशभ्रतार यांस जेतवन येथील 877 चौरस फुटांची सदनिका देण्यात आली आहे.