IND-W vs AUS-W 2nd T20I Live Updates : भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांमधील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीत खेळवला जात आहे. भारताने या मैदानावरील पहिला टी-20 सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे . आता टीम इंडियाची नजर दुसरी टी-20 जिंकून मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेण्याकडे आहे. भारताने यापूर्वी 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीवर तीन सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने पराभूत केले होते.
ऑस्ट्रेलियन कर्णधार अॅलिसा हिलीने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने 20 षटकांत आठ विकेट गमावून 130 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 131 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. टीम इंडियाकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक 30 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून किम गर्थ, अॅनाबेल सदरलँड आणि जॉर्जिया वेअरहम यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
Innings Break! #TeamIndia post 130/8 on the board.
3⃣0⃣ runs for @Deepti_Sharma06
2⃣3⃣ runs each for @13richaghosh & vice-captain @mandhana_smritiOver to our bowlers now 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/ar0sCktbHa#INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/5gbXv2QU22
— BCCI Women (@BCCIWomen) January 7, 2024
शेफाली-जेमिमाची नाही चालली बॅट
दुसऱ्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर शेफाली वर्माच्या रूपाने संघाला पहिला धक्का बसला. तिला किम गर्थने एलबीडब्ल्यू केले. शेफालीला एकच धाव करता आली. तिच्यानंतर जेमिमाह रॉड्रिग्ज क्रिजवर आली आणि तिने नऊ चेंडूत 13 धावा केल्या. किम गर्थच्या चेंडूवर तीला अॅलिसा हिलीने झेलबाद केले.
मंधाना आणि हरमनप्रीतही ठरल्या अपयशी
स्मृती मंधानाच्या रूपाने संघाला तिसरा धक्का बसला. 26 चेंडूत 23 धावा करून ती बाद झाली. मंधानाला अॅनाबेल सदरलँडने एलिस पेरीच्या हाती झेलबाद केले. तिच्यापाठोपाठ हरमनप्रीत कौरही पॅव्हेलियनमध्ये परतली. तिने 12 चेंडूत सहा धावा केल्या. अॅशले गार्डनरच्या चेंडूवर ती अॅलिस पॅरीकरवी झेलबाद झाली. रिचा घोष (23) हिला जॉर्जिया वेअरहमने एलबीडब्ल्यू (LBW) आऊट केले.
INDW vs AUSW 2nd T20 : ऑस्ट्रेलियाचा गोलंदाजीचा निर्णय; जाणून घ्या, दोन्ही संघाचं Playing 11…
दीप्तीने भारताला 130 धावांपर्यंत पोहोचवले
पूजा वस्त्राकर नऊ धावा करून वेरहॅमच्या चेंडूवर बाद झाली. अमनजोत कौर (चार धावा) अॅनाबेल सदरलँडकरवी ताहलिया मॅकग्राकडे झेलबाद झाली. डावाच्या शेवटच्या चेंडूवर दीप्ती शर्मा बाद झाली. तिने 27 चेंडूत 30 धावा करत टीम इंडियाला 130 धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तिने पाच चौकार मारले. श्रेयंका पाटील सात धावा करून नाबाद राहिली.