नवी दिल्ली – सागरी चाच्यांनी अपहरण करण्याचा प्रयत्न केल्यानंतर भारतीय नौदलाने सोडवलेल्या एमव्ही लिला नॉर्फ्लोक या नौकेवरील भारतीय कर्मचाऱ्यांनी आज भारतीय नौदलाचे आभार मानले आणि हर्षोल्हासाने भारत माता की जय च्या घोषणा दिल्या.
सोमोलियाच्या किनाऱ्याजवळ सागरी चाच्यांनी शुक्रवारी या व्यापारी मालवाहू जहाजाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. मदतीचा इशारा मिळाल्यानंतर भारतीय नौदलाचे आयएनएस चेन्नई हे जहाज तातडीने रवाना झाले आणि सागरी चाच्यांना पिटाळून लावण्यात आले होते.
यावेळी एमव्ही लिला नॉर्फ्लोक या जहाजाची किरकोळ हानी झाली होती. या जहाजाच्या दुरुस्तीसाठी हे जहाज थांबवण्यात आले होते. नौदलाने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, क्रू मेंबर्स “भारत माता की जय” चा नारा देताना आणि भारतीय नौदलाचे आभार मानताना दिसत आहेत.
“Guardians of the Seas”#IndianNavy‘s swift action foils Hijack attempt! heroic rescue of MV Lila Norfolk’s crew by #marcos #INSChennai.
A beacon of humanitarian aid in Maritime Security Operations across oceans 🌊; ⚓ Indian Navy remains committed to a #CombatReady, #Credible,… https://t.co/FiBMOoiKA7 pic.twitter.com/PlDQv72huW
— IN (@IndiannavyMedia) January 6, 2024
“आम्ही 24 तास अडकलो होतो. भारतीय नौदल त्यांना वाचवण्यासाठी आल्यानंतर आम्हाला दिलासा मिळाला.” असे भारतीय नौदलाने वाचवलेल्या भारतीयांपैकी एकाने सांगितले, तर “आम्हाला भारतीय नौदलाचा अभिमान आहे.” असे दुसरा माणूस म्हणाला,