चिंबळी -हातावर पोट असलेल्या कामगारांप्रमाणेच मूर्तीकारांनादेखील करोनाची झळ बसली आहे. मरकळ येथील मूर्ती कारागिर संभाजी कुंभार व कुरूळी येथील आण्णा माळशिकर, किसन माळशिकर, चंद्रकांत माळशिकर व रघुनाथ जगताप, ज्ञानेश्वर माळशिकर आदींनी आपली भावना व्यक्त केली आहे.
गणेशोत्सवाच्या तीन महिने अगोदर मूर्ती बनविण्याचे काम सुरू केले जाते; परंतु यावर्षी करोनाचा प्रादुर्भाव मार्च महिन्याच्या सुरूवातीला झाला असल्याने गणेश मूर्ती बनविण्याच्या कामाला अद्यापही कच्चा मालाचा तुटवडा जाणवत आहे. लॉकडाऊनमुळे केरळमधून कच्चा आणि राजस्थानमधून प्लॅस्टर ऑफ पॅरिस तसेच शाडू माती हा माल पुण्यात येऊ शकला नाही. त्यामुळे मूर्तीकारांसमोरच्या अडचणी अधिकच वाढणार आहेत.