मुंबई : राजस्थान विधानसभा निवडणुकांदरम्यान (Rajsthan election) एका पोस्टरवरून सध्या महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजस्थान दौऱ्यावर गेले होते. यावेळी मोठी रॅली काढण्यात आली होती. यावेळी उमेदवाराच्या प्रचारासाठी लावलेल्या पोस्टरवर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा उल्लेख ‘हिंदू हृदयसम्राट’ असा करण्यात आला. या पोस्टरचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यावर आता भाजपने देखील प्रतिक्रिया दिली आहे.(hindu hridaySamrat eknath shinde poster)
मुख्यमंत्री शिंदेंचा (CM Shinde) हिंदू ह्रदयसम्राट असा उल्लेख केल्याने राज्यातील राजकारण चांगलच तापायला सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाने (Thackeray group) ट्विट करत याबाबत जोरदार संताप व्यक्त केला. “पक्ष चोरला, नाव चोरलं, बाप चोरायचा प्रयत्न केला… आता हेही? किती तो निर्लज्जपणा? जगात ‘हिंदुहृदयसम्राट’ फक्त एकच…. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ! त्यांच्या आधी ना कोणी होता, त्यांच्यानंतर ना कोणी होऊ शकेल! जनता दूधखुळी नाहीये, सगळ्याचा हिशोब होणार !” असं ट्विट अधिकृत एक्सवरून करण्यात आलं आहे. (Hindu hridaySamrat balasaheb thackeray)
पक्ष चोरला, नाव चोरलं, बाप चोरायचा प्रयत्न केला… आता हेही? किती तो निर्लज्जपणा?
जगात ‘हिंदुहृदयसम्राट’ फक्त एकच…. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे!
त्यांच्या आधी ना कोणी होता, त्यांच्यानंतर ना कोणी होऊ शकेल!जनता दूधखुळी नाहीये,
सगळ्याचा हिशोब होणार! pic.twitter.com/nBJrne46Lb— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) November 23, 2023
या प्रकरणावरून आता आरोप प्रत्यारोप सुरु झाल्याने भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी देखील या प्रकारावर भाष्य केलं आहे. “एकनाथ शिंदे यांनी हातावर प्राण घेऊन बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या रक्षणासाठी इतकं मोठं पाऊल उचललं तर कार्यकर्त्यांना हिंदुत्वाचा आवाज म्हणजे एकनाथ शिंदे असं वाटणं साहजिक आहे, त्यामुळे उत्साहात कार्यकर्त्यांनी तसं बॅनरवर लिहिलं, तर त्याचा एवढा बाऊ करून एवढं राजकारण करणं गैर आहे” असं मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
नेमक काय आहे पोस्टरमध्ये ?
राजस्थानमधील हवामहल विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार बालमुकुंदाचार्य महाराज (हाथोज धाम) यांच्या प्रचारासाठी काल एकनाथ शिंदे गेले होते. यावेळी शास्त्री नगर भागापासून भाजप कार्यालयापर्यंत विशाल वाहन रॅली काढण्यात आली.यासंबंधी माहिती देणाऱ्या पोस्टरच्या सर्वात वर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष जे पी नड्डा, वसुंधरा राजे यांच्यासह काही भाजप नेत्यांचे फोटो आहेत. त्याखाली ‘हिंदू हृदय सम्राट माननीय एकनाथ शिंदे जी का हवामहल की पावन धारा पर हार्दिक स्वागत’ असं लिहिण्यात आलं आहे. त्यावरुन आता राजकारण तापायला सुरुवात झाली आहे.