नवी दिल्ली भारतीय मनोरंजनाच्या क्षेत्रात दिवाणखान्यातील टीव्ही हा एक अविभाज्य भाग झाला आहे आणि टीव्हीवरील मालिका असो किंवा इतर कार्यक्रम असो सर्व कार्यक्रमांच्या केंद्रस्थानी महिला असतात पण या सर्व कार्यक्रमांना महिलाच जास्त प्रतिसाद देत असतील असे वाटू शकते पण नुकत्याच जाहीर झालेल्या एका अहवालाप्रमाणे भारतात महिलांपेक्षा पुरुषांचे टीव्ही पाहण्याचे प्रमाण जास्त आहे नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे या संस्थेने केलेल्या पाहणीप्रमाणे भारतातील 55 टक्के पुरुष टीव्ही पाहतात तर महिलांच्या बाबतीत मात्र हे प्रमाण फक्त 53 टक्के आहे जी संस्था दर ठराविक वर्षाच्या कालावधीनंतर आपला अहवाल जाहीर करते आज पर्यंत या संस्थेने जाहीर केलेल्या अहवालावर नजर टाकली तर प्रत्येक वेळीच पुरुषांचे टीव्ही पाहण्याचे प्रमाण महिलांपेक्षा जास्त आढळले आहे.
2005 या वर्षांमध्ये जाहीर झालेल्या अहवालातील माहितीप्रमाणे त्या काळामध्ये पुरुषांचे टीव्ही पाहण्याचे प्रमाण तब्बल 63 टक्के होते या संस्थेने केलेल्या पाहणीतील निष्कर्षाप्रमाणे भारतातील बिहार या राज्यातील तब्बल सत्तर टक्के महिला अजिबातच टीव्ही पाहत नाहीत जेव्हा सर्वप्रथम 1990 मध्ये पाहणीला सुरुवात केली होती तेव्हा या संस्थेने भारतातील किती घरांमध्ये टीव्ही आहे याबाबतचा अहवाल सर्वात प्रथम जाहीर केला होता.
आज 2023 मध्ये सुद्धा भारतातील 30 टक्के पेक्षा जास्त घरामध्ये टीव्ही नसल्याचे या पाहणीतून समोर आले आहे अहवालातील आणखी काही निष्कर्षावर जर टाकली तर भारतातील एकूण राज्यांपैकी 16 राज्यांमध्ये महिलांपेक्षा पुरुषांचे टीव्ही पाहण्याचे प्रमाण जास्त आहे तर उरलेला राज्यांमध्ये महिलांचे प्रमाण जास्त आहे पण तरीसुद्धा राष्ट्रीय सरासरीचा विचार करता महिलांपेक्षा पुरुषांचेच टीव्ही पाहण्याचे प्रमाण जास्त आहे राज्यांचा विचार करता देशातील गोवा या राज्यामध्ये सर्वात जास्त टीव्ही पाहिला जातो तर बिहार आणि झारखंड या राज्यामध्ये सर्वात कमी टीव्ही पाहिला जातो गोव्यात 90% पुरुष आणि 85% महिला टीव्ही पाहतात तर बिहार आणि झारखंड या राज्यातील 34% पुरुष आणि 32 टक्के महिला टीव्ही पाहणे पसंद करतात.