नवी दिल्ली : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये कोरोना बाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना त्यांच्या घरातून बाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार घडले आहे. या संदर्भात हस्तक्षेप करण्याची विनंती एम्सने गृहमंत्री अमित शहा यांना केली आहे.
एम्सच्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने म्हटले आहे की, अथकपणे कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांना घर खाली करायला लावणाऱ्या घरमालकांना मनाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती आम्ही करत आहोत. त्यामुळे कोरोनाच्या साथीच्या वेळी आम्ही देशाची सेवा करू शकू, असे या पत्रात नमूद केले आहे.
देशात वेगाने पसरणऱ्या संसर्गामुळे सर्वत्र लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे डॉक्टरांच्या वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे, याकडे या पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे. अलीकडेच कोरोनाबाधित देशांमधून भारतीयांना मायदेशी आणलेल्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना बहिष्कृत करण्याच्या घडल्या होत्या.