नांदेड : जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. विपिन यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी काढलेल्या जमावबंदी व संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या ३८ जणांविरुद्ध आतापर्यंत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
यातील तब्बल १८ गुन्हे मागच्या २४ तासात नोंदवण्यात आले आहेत. किनवट- ५, इतवारा ४ आणि नांदेड शहरातील ग्रामीण, भाग्यनगर, वजिराबाद व शिवाजीनगर पोलीस ठाण्यात काल दिवसभरात प्रत्येकी एक गुन्हा दाखल झाला आहे.