MC Stan| बिग बॉस 16 मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला रॅपर एम सी स्टॅन सोशल मीडियावर देखील सक्रीय असतो. या शोचा तो विजेता देखील ठरला होता. नुकतेच त्याने इनस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यानंतर एमसी स्टॅन रॅप सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. एम सी स्टॅनने स्वत:च इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत रॅप सोडत असल्याची माहिती दिली.
एम सी स्टॅन रॅपच सोडणार असल्याचं त्याने लिहिल्याने चाहते संभ्रमात पडले आहेत. एमसी स्टॅनने पोस्टमध्ये “मी रॅपिंग सोडणार आहे,” असं लिहिलं आणि त्याचबरोबर रेड हार्ट इमोजी पोस्ट केला होता. त्याने घोषणा केली आहे की तो येत्या काळात रॅप सोडणार असल्याचा विचार करतोय, याबाबत स्पष्टता नाही. विशेष म्हणजे काही वेळाने त्याने स्टोरी डिलीटही केली.
एम सी स्टॅनचं रॅप याची अनेक रॅप गाणी गाजली आहेत. तो लाईव्ह कॉन्सर्ट्सही करतो. गाण्यांना प्रेक्षकांचा देखील मोठा प्रतिसाद मिळतो. अत्यंत गरीब परिस्थितीतून मोठे यश मिळवलेला एम सी स्टॅन रॅप का सोडतोय असाच प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तर काही जणांनी तो प्रमोशनल अॅक्टिव्हिटी अथवा पब्लिसिटी स्टंट करत असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
एम सी स्टॅनच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, त्याने ‘फर्रे’ चित्रपटातील गाण्याने गायक म्हणून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. नुकताच ८ मार्च रोजी त्याचा ‘नम्ब’ नावाचा म्युझिक व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
हेही वाचा:
उद्धव ठाकरेंची शिवसेनाच मविआत मोठा भाऊ! लढवणार ‘या’ २१ जागा…