लवकरच बिग बॉस ओटीटीचा सीझन 3 जिओ सिनेमावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. येत्या महिन्यात 15 मे रोजी शोचा प्रीमियर होऊ शकतो. मात्र, आतापर्यंत या शोमध्ये सहभागी होणाऱ्या कोणत्याही स्पर्धकासोबत निर्मात्यांनी करार केलेला नाही.
नेहमीप्रमाणे, निर्मात्यांना या सीझनमध्येही अशा काही सेलिब्रिटींचा समावेश करायचा आहे, जे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करतील. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधून बाहेर पडल्यानंतर या शोमध्ये शहजादा धामीची एन्ट्री जवळपास निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.
शाहरुख खानची ऑनस्क्रीन मुलगी सना सईदला या शोसाठी संपर्क साधण्यात आला आहे जो जिओ सिनेमावर 24 तास लाइव्ह स्ट्रीम केला जाईल.
‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटात सनाने शाहरुखच्या मुलीची ‘अंजली’ची भूमिका साकारली होती. सना सोबत, यूट्यूबर सोनिया सिंह देखील बिग बॉस OTT 3 च्या स्पर्धकांमध्ये सामील होऊ शकतात. बिग बॉस OTT 3 साठी सना आणि सोनिया व्यतिरिक्त विकी जैन, गायक श्रीराम चंद्र, हर्ष बेनीवाल, सुरभी ज्योती, महेश केशवाला, अरमान बहल अशी अनेक नावे चर्चेत आहेत.
‘बिग बॉस ओटीटी’च्या सीझन 3 साठी सलमान खानला साइन करण्यासाठी निर्माते देखील उत्सुक आहेत. मात्र, या प्रकरणी सलमान खानची टीम निर्मात्यांशी चर्चा करत आहे.