उद्धव ठाकरेंची शिवसेनाच मविआत मोठा भाऊ! लढवणार ‘या’ २१ जागा…

MVA Lok Sabha Election 2024| आज महाविकास आघाडीची तसेच इंडिया आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद मुंबईतील शिवालय कार्यालयात पार पडली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह इतर प्रमुख नेतेमंडळी उपस्थित होती.
यावेळी महाविकास आघाडीच्या प्रमुख शिल्पकारांपैकी एक असलेल्या संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर केले.
यामध्ये, शिवसेना 21, राष्ट्रवादी काँग्रेस 10 आणि काँग्रेस 17 जागांवर निवडणूक लढणार असल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानुसार आता महाविकास आघाडीचा 21-17-10 असा फॉर्म्युला निश्चित झाला आहे.
महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंची शिवसेनाच मोठा भाऊ ठरली आहे. शिवसेना एकूण 21 जागांवर निवडणूक लढवणार आहे.
मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण आणि मुंबई ईशान्य, मावळ, सांगली, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, संभाजी नगर, शिर्डी, जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, यवतमाळ, वाशीम आणि हिंगोली या 21 जागांवर शिवसेना निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे.
शिवसेना ठाकरे गटाने पहिल्या यादीत 17 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती. त्यानंतर काही दिवसांनी उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत 4 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. आतापर्यंत अशा एकूण सर्व 21 जागांवर शिवसेनेकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे 21 उमेदवार कोणते ते पाहुयात…
मतदार संघ – उमेदवार । MVA Lok Sabha Election 2024
- बुलढाणा – नरेंद्र खेडकर
- हिंगोली – नागेश आष्टीकर
- हातकणंगले – सत्यजित पाटील.
- मावळ – संजोग वाघेरे-पाटील
- छत्रपती संभाजीनगर -चंद्रकांत खैरे
- यवतमाळ-वाशिम -संजय देशमुख
- शिर्डी -भाऊसाहेब वाघचौरे
- नाशिक – राजाभाई वाजे
- धाराशिव – ओमराजे निंबाळकर
- रायगड – अनंत गीते
- सिंधुदुर्ग, रत्नागिरी -विनायक राऊत
- मुंबई-वायव्य – अमोल किर्तीकर
- ठाणे – राजन विचारे
- मुंबई-ईशान्य – संजय दिना पाटील
- मुंबई-दक्षिण – अरविंद सावंत
- मुंबई, दक्षिण मध्य – अनिल देसाई
- सत्यजीत पाटील -हातकणंगले
- परभणी -संजय जाधव
- कल्याण -वैशाली दरेकर
- पालघर -भारती कामडी
- जळगाव – करण पवार.
हेही वाचा: । MVA Lok Sabha Election 2024
महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अखेर जाहीर; लोकसभा निवडणुकीसाठी कोणाला किती जागा मिळाल्या?





