नवी दिल्ली: राहुल गांधी यांच्या विधानाला विरोध करणाऱ्या आणि नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेला पाठिंबा दिल्याबद्दल बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली आहे. कॉंग्रस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी मायावती यांनी केली आहे.
“शिवसेना अजूनही आपल्या अजेंड्यावर ठाम आहे. केंद्राच्य नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. आता महाराष्ट्रात सावरकरांबाबतच्या कॉंग्रेसच्या धोरणालाही शिवसेना विरोध करत आहे. तरिही कॉंग्रेस शिवसेनेलाच पाठिंबा देत आहे. हा कॉंग्रेसचा दुटप्पीपणा नाही का.’ असा सवाल मायावती यांनी ट्विटरवर उपस्थित केला आहे आणि कॉंग्रेसला भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले.
कॉंग्रेसने जर भूमिका स्पष्ट केली नाही, तर आपल्याच पक्षातील त्रुटींकडून दुसरीकडे लक्ष वेधण्यासाठी केलेला हा “ड्रामा’ होता, असे म्हणावे लागेल, अशी टीका मायावतींनी केली.