Ravindra Dhangekar troll । लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता चांगलाच रंग चढताना दिसून येतोय. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहेत. त्यातच पुण्यात महविकास आघाडीचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांना सध्या ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहेत. पुण्यात भाजपने मुरलीधर मोहोळ तर काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे.
भाजपकडून ट्रोलिंगला सुरूवात Ravindra Dhangekar troll ।
सोशल मीडियावर निवडणुकीची लढाई सुरू असून भाजपनेही धंगेकरांचे ट्रोलिंग सुरू केले आहे. ‘मविआचा अशिक्षित उमेदवार’, ‘रवींद्र धंगेकर फक्त 8वी पास !’ , ‘शिक्षणाचे माहेरघर पुण्याचा उमेदवारच अशिक्षित’ असा मजकूर असणारा धंगेकरांचा फोटो सध्या सोशल मीडियावरून व्हायरल होतोय. भाजपने या माध्यमातून धंगेकरांचं शिक्षण काढत त्यांना ट्रोल केलंय.
धंगेकरांकडून चोख प्रत्युत्तर Ravindra Dhangekar troll ।
तर दुसरीकडे भाजपने केलेले ट्रोलिंग धंगेकरांनी फारसं मनावर घेतलं नाही, त्या उलट त्यांनी या ट्रोलर्सचा चांगलाच समाचार घेत चोख प्रत्युत्तर दिलंय. ‘ ते माझ्या शिक्षणावर घसरलेत म्हणजे ( त्यांना) त्यांचा पराभव दिसतोय’ असे सांगत माझी जनतेत पीएचडी झाली आहे, जनतेनं मला पीएचडीचं प्रमाणपत्र दिलं आहे असा विश्वास धंगेकरांनी व्यक्त केला आहे.
मोदींची हवा असती तर…
एवढंच नव्हे तर धंगेकर यांनी भाजप नेते, पंतप्रधान मोदी यांच्यावरही टीका केली. ‘हू इज़ धंगेकर’ म्हणून मला ट्रोल केलं जातंय, पण देशात जर मोदींची हवा असती तर भाजपला अजित पवार ,अशोक चव्हाण यांना पक्षात घ्यावं लागलं नसतं असा चिमटा धंगेकर यांनी काढत भाजपवर टीकास्त्र सोडलं. आज ते टू व्हीलर वर फिरतायत , मी मात्र त्यांना रस्त्यावर आणणार , असंही ते म्हणाले. मी जिकडे जाईल तिकडे त्यांना (भाजपला) प्रचार करावा लागतोय, ते माझ्यापुढे जाऊ शकत नाहीत अशी टीकाही धंगेकर यांनी केली.