जकार्ता – इंडोनेशियाच्या उत्तरेकडील तराह मेराह भागात काल संध्याकाळी एका तेलाच्या डेपोला लागलेल्या भीषण आगीमध्ये किमान 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य डझनभर जण बेपत्ता झाले आहेत. या आगीमुळे तेलाच्या डेपोची इमारत जमिनदोस्त झाली असून या ढिगाऱ्याखाली अनेकजण गाडले गेले असल्याची शक्यता व्यक्त होते आहे.
पावसामुळे गॅस पाइइपलाइन फुटली असावी आणि वीज पडल्यामुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो आहे. या पाइपलाइनमधून गॅसची गळती देखील व्हायला लागली होती. मोठ्या स्फोटाने ही आग झपाट्याने पसरली.
प्लंपेंग ऑईल स्टेशन राजधानी जकार्ताच्या मध्यवर्ती भागातच असून तेथून पेर्तामानिया या सरकारी तेल कंपनीचे कामकाज चालते. संपूर्ण इंडोनेशिया होणाऱ्या तेल पुरवठ्यापैकी 25 टक्के तेलाचा पुरवठा या तेलाच्या डेपोतून करण्यात येत असतो.
Pakistan : डबघाईला आलेल्या पाकला चीनकडून पुन्हा मदत; आणखीन 1.3 अब्ज डॉलरचे..
आग लागल्यानंतर अवघ्या 20 मिनिटात आगीने रौद्र रुप धारण केले आणि संपूर्ण तेल डेपो जळून खाक जाला. सेजारील काही घरे देखील या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सुंमारे 260 फायर फायटर आणि 200 कर्मचारी या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते. मध्यरात्रीच्या सुमारास या आगीवर नियंत्रण मिळवता आले.