इस्लामाबाद – पाकिस्तानला मित्र देश चीनकडून आणखीन 1.3 अब्ज डॉलरचे कर्ज मिळणार आहे. पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दर यांनी सोमवारी ही माहिती दिली. काही दिवसांपूर्वीच चीनकडून पाकिस्तानला 700 दशलक्ष डॉलरचे कर्ज मिळाले आहे. त्यानंतर थोड्याच दिवसात चीनच्या औद्योगिक आणि वाणिज्य बॅंकेकडून पाकिस्तानला नव्याने कर्ज मंजूर झाल्याचे दर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
चीनच्या औद्योगिक वाणिज्य बॅंकेबरोबरच्या चर्चेच्या सर्व औपचारिकता आता पूर्ण झाल्या आहेत. पूर्वीच्या कर्जापैकी 1.3 अब्ज डॉलरची परतफेड गेल्या काही महिन्यात पाकिस्तानने केली आहे. आता चीनच्या बॅंकेकडून नव्याने 1.3 अब्ज डॉलरचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे.
Malaysia : माजी पंतप्रधान नजीब यांची भ्रष्टाचार प्रकरणी निर्दोष मुक्तता; 4.5 अब्ज डॉलरच्या…
आगामी काही दिवसात, सोमवार किंवा मंगळवार पर्यंत चीनच्या बॅंकेकडून पाकिस्तानला 500 दशलक्ष डॉलर उपलब्ध करून दिले जातील. त्यानंतर आणखीन 10 दिवसात आणखीन 500 दशलक्ष डॉलर पाकिस्तानला उपलब्ध करून दिले जाईल, असे दर यांनी सांगितले. चीनकडून मिळालेल्या या आर्थिक मदतीबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाझ शरीफ यांनी चीनचे आभार मानले आहेत.