नगर – निंबोडी (ता. नगर) शिवारात 25 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात पीडितेच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. अक्षय माळी, व आकाश पोटे, अशी या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांना पोलिसांनी अटक केली असून, यातील पसार झालेल्या एकाचा शोध सुरू आहे. त्यासाठी भिंगार कॅम्प पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.
याबाबत सविस्तर असे की, पीडीत महिला कामानिमित्त आष्टी येथून नगर येथे आली होती. काम आटोपल्यानंतर ती रस्त्याने निंबोडी शिवारातून जात असताना तिच्यावर तीन नराधमांनी सामूहिक अत्याचार केला.
त्यानंतर पीडितेने भिंगार कॅम्प पोलीस ठाणे गाठले व घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी अक्षय माळी याच्यासह त्याच्या दोन साथिदारांवर गुन्हा दाखल केला आहे.