बॉलिवूडमध्ये करोनाचा प्रकोप वाढला.! ‘अक्षय कुमार’चा करोना अहवाल पॉझिटिव्ह

मुंबई – सध्या देशासह राज्यात सुद्धा करोनाचा प्रभाव झपाट्यापे वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन करोनाबाधित सापडत आहे. अश्यातच आता करोनाचे सावट बॉलिवूडवर देखील पसरले आहे. पहिल्या लाटेतून वाचलेल्या अनेक कलाकारांना दुसऱ्या लाटेने मात्र तडाखा दिला आहे. अभिनेता रणबीर कपूर आणि आमिर खान, मिलिंद सोमण, बप्पी लहरी, परेश रावल यांना काहीदिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती.

अश्यातच आता बॉलिवूड  अभिनेता अक्षय कुमारला करोना झाल्याचे समोर आले आहे. सध्या अक्षय होम क्वारंटाइन आहे.  अक्षयने इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी पोस्ट करत करोना चाचणी पॉजिटीव्हआल्याचे सांगितले आहे.

“आज सकाळी माझी कोविड 19 टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मी सर्व प्रोटोकॉल पाळत स्वत:ला आयसोलेट केलं आहे. मी घरी क्वॉरंटाईन झालो आहे आणि सर्व आवश्यक वैद्यकीय उपचार घेत आहे. विनंती करतो की माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी त्यांची कोरोना टेस्ट करुन घ्यावी आणि स्वत: ची काळजी घ्यावी. ‘

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.